आजरा कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणाचा तपास जलद गतीने होऊन आरोपीना शासन व्हाव. याबाबत – राज्यपाल.व मुख्यमंत्री याना निवेदन प्रती सादर. -( तपास आजरा पोलीस स्टेशन करत असताना नियमबाह्य समिती स्थापन करण्याचा उद्देश काय. – कारखाना सभासद सुनिल शिंदे )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखाण्यात बेअरिंग व मोटर चोरी झाली म्हणून कारखाना संचालक मंडळाने आजरा पोलीस स्टेशन कडे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही चौकशी कारवाई काय चालु आहे. याबाबत सभासदांना किंचितही माहित नाही. कारखान्यातील फायदे किंवा तोटे याला जबाबदार संचालक मंडळ असते. बेअरिंग व मोटर चोरी प्रकरणा नंतर संचालक मंडळाने चौकशी समिती स्थापन केली व यामध्ये काही अधिकारी व कर्मचारी जबाबदार धरले असले तरी हा नियमबाह्य अधिकार संचालक मंडळाला दिला कोणी असा प्रश्न उपस्थित होतो. जर आपण आजरा पोलीस स्टेशन यांच्याकडे फिर्याद दाखल केली असताना आपण समिती स्थापन करण्यात उद्देश कोणता असावा वेळप्रसंगी सी.आय.डी मार्फत चौकशी करावी किती लाखाचा माल आहे. हे अद्याप काहीच कळत नाही. ही चोरी आता पुरती मर्यादित आहे. की यापूर्वी हे खूप वर्षे रॅकेट होते. हे समजणे महत्वाचे आहे. यामध्ये चौकशी समितीने काही कर्मचारी अधिकारी आणि आणखीन काही लोक जबाबदार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्या दिवशी स्क्रॅप माल घेऊन जाणारा ट्रक व माल भरण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी जप्त करणे गरजेचे आहे. या आपल्या समिती मुळे चालू असलेल्या तपास दिशहिन होऊ शकतो प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्याय होऊ शकतो चोर सोडून संन्याशाला फाशीही होण्याची शक्यता आहे. तेव्हा पोलिस यंत्रणेत लवकरात लवकर तपास करून चोरांना अटक करावी विलंब झाल्यास लोकशाहीच्या पद्धतीने सर्व स्तरावर लेखी तक्रार मोर्चे उपोषण या मार्गे न्याय मागितला जाईल कारखाना वाचवण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. पुढील कार्यवाही तात्काळ व्हावी अशा अशयाचे निवेदन कारखाना सभासद सुनिल नारायण शिंदे यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस जिल्हाप्रमुख, तहसीलदार आजरा, आजरा पोलीस स्टेशन,चेअरमन आजरा साखर कारखाना व आजरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व राज्यपाल यांना सादर करण्यात आल्या आहेत.
