गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग
अंत्यदर्शनाची 36 तासांचं वेटिंग,
दुर्गंध पसरतोय
गुजरात गांधीनगर.वृतसंस्था. १९ .
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुजरात राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज वलसाडच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पीटलमधील घटनेवरुन लावला जाऊ शकतो. या हॉस्पीटलच्या कोरोना वार्डातून एका पाठोपाठ एक मृतदेह येतच आहेत. पोस्टमॉर्टम रुममध्येही मृतदेह तसेच पडून आहेत. जिल्ह्यात अचानक वाढलेल्या मृत्यूंमुळे डेथ सर्टिफिकेट तयार करायलाही तासनतास लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की,अनेक मृतदेहांवर मागील तीन दिवसांपासून अंत्यविधी करण्यात आलेला नाही. त्यांना तसेच ठेवल्यामुळे त्यांच्यातून आता वास येऊ लागला आहे.
सिव्हिल हॉस्पीटलचे सुपरिटेंडेंट अमित शहा यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी 400 बेडची सुविधा आहे. पण, अनेक जण परिस्थी गंभीर झाल्यानंतर हॉस्पीटलमध्ये भरती होत आहेत. अशावेळी त्यांना ऑक्सीजन किंवा व्हेटिलेटरची गरज भासत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे आमचे कामही वाढले आहे. कोव्हिड वार्डातून पोस्ट मॉर्टम रुमपर्यंत मृतदेहांना नेण्यासाठी बाहेरून लोक बोलवावे लागत आहेत.
वलसाड सिव्हिल हॉस्पीटलबाहेर मृतांचे नातेवाईक अनेक तासांपासून मृतदेहाची वाट पाहत आहेत. यातील काहीजण 36 तासांपासून अंत्यदर्शनाची आस लावून बसले आहेत. हॉस्पीटलच्या गलथान कारभारामुळे लोकांमध्येही नाराजी वाढत आहे.