पेरणोलीत कडक लॉकडाऊनचा निर्णय
तीन दिवस राहणार बंद, साखळी तोडण्याचा प्रयत्न.
आजरा : प्रतिनिधी.
पेरणोली ता आजरा येथे कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमूळे तीनदिवस गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी दक्षता समितीच्या अध्यक्षा व सरपंच उषा जाधव होत्या.
गत आठ दिवसापासून गावात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. सोमवार दि. १९ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून गुरुवार दि २२ एप्रिल रात्री ८ पर्यंत लॉकडाऊन होणार आहे.
या काळात दवाखाने, मेडिकल वगळता किराणा दुकान, पिठाची गिरण, पतसंस्था, सेवा संस्था, बँक आदी व्यवहार बंद राहणार आहेत.
बैठकिला सभापती उदयराज पोवार, कॉ.संपत देसाई, तानाजी देसाई,उपसरपंच उत्तम देसाई, अमर पोवार, कृष्णा सावंत,संदिप नावलकर, शेखर कऴेकर, लक्ष्मी जोशीलकर,अर्जुन कांबळे,परसू जाधव, भिमराव हळवणकर , ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे , तलाठी दिपा पोवार आदी उपस्थित होते.