जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगायला शिका हा संदेश देणारा. –
व्यंकटराव हायस्कूल आजरा १९९५ चा विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी. १४
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरा या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. १४ रोजी उत्साहात संपन्न झाला. शाळेत सन. १९९५ सालात दहावी इय्येत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी हायस्कूल मधील इयत्ता १० मधुन शिक्षण घेऊन बाहेर पडलेली सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा एकत्रितपणे एकाच व्यासपीठावर आमंत्रित करून जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी सुचित्रा पाकले ( मोरवाडकर) यांनी प्रास्ताविकात १९९५ ते २०२२ पर्यत जपुन ठेवलेल्या आठवणींचा उजाळा दिला.

गुलाब पुष्प देऊन सर्व मित्र मैत्रिणी यांचे स्वागत सुमित्रा सावंत ( देसाई) व संभाजी जाधव यांनी केले. कार्यक्रमच्या सुरवातीस दीपप्रज्वलन सर्व माजी विद्यार्थ्यांनीच्या हस्ते करुन गुरुवर्य कै. मोरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. कोरोणा काळात शिक्षक तसेच वर्ग मित्रांच्या कुटुंबातील निधन झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व मित्र-मैत्रिणी यांनी आपला परिचय, जीवन प्रवास आपल्या मनोगतात सांगितला यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक जबाबदारी सोबत नोकरी-व्यवसाय व धावपळीच्या जीवनात यश संपादन करण्यासाठी आपण सर्वजण धावपळ करत असतो. परंतु या सोबत आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काही या समाजाचे देणे लागतो या सर्व गोष्टी सोबत यामागे आपण अनेकांना सहकार्य केले आहेच यापुढील काळात देखील आपण आपल्या स्नेह मेळावा निमित्त उपस्थित असलेल्या व आपल्या कामानिमित्त अनुपस्थित राहिलेल्या सर्व मित्र मैत्रिणी यांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येऊन काम करूया एक – मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ. .. संदेश देणारा हा मेळावा ठरला. . अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या. दिवसभरात सकाळी १० वा. वाजल्यापासून व्यंकटराव हायस्कूल आजरा या ठिकाणी सरस्वती मुर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.


यानंतर रामतीर्थ या पर्यटन स्थळावर श्रीरामाचे दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमास स्थळी कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, भारतीय नृत्य, कला क्रीडा व सांस्कृतिक या सर्व कलेचे प्रदर्शन प्रत्येकाने जपून ठेवलेल्या कला आज प्रत्यक्षात दाखवण्याचा योग आल्यामुळे व एकमेकाचा हट्ट पुरवण्यात आला. एकंदरीत धकाधकीच्या जीवनात जीवनही खुप सुंदर आहे. ते आनंदाने जगायला शिका व दुसऱ्यालाही आनंद द्या. अशाच भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. या मेळाव्यात प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य होतं. आज माझ्या जीवनातील अत्यंत आनंदी दिवस अनुभवयास मिळाला.
सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत आपल्या एक दिवशी शाळेचा आनंद लुटला. व कार्यक्रमाची सांगता “तू बुद्धि दे तू तेज दे” या गीतानंतर राष्ट्रगीताने झाली. या स्नेह – मेळाव्यासाठी गजानन आजरेकर, योगेश नाईक, राकेश करमळकर, राहुल नेवरेकर, अमर कांबळे, सुचित्रा पाकले ( मोरवाडकर ) सह मित्र-मैत्रिणी यांनी परिश्रम घेतले. अ, ब, क, ड या सर्व तुकडीतील सर्व मित्र-मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


