Homeकोंकण - ठाणेमाझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो. मला जनतेचे आशीर्वाद.- देवेंद्र...

माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो. मला जनतेचे आशीर्वाद.- देवेंद्र फडणवीस.

माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो. मला जनतेचे आशीर्वाद.- देवेंद्र फडणवीस

मुंबई. प्रतिनिधी. १९

देशात आणि राज्यात सध्या कोरोनामुळे सामान्य लोकं धास्तावलेली आहे. कोरोनाचा कहर एवढा वाढला आहे की आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने रुग्ण आणि त्यांचेच कुटुंबीय देखील चिंतेत आहेत. त्यात भाजप केंद्राकडे मदत मागायची सोडून राज्य सरकार कसं अडचणीत येईल याचीच आखणी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार देखील संतापल्याचं पाहायला मिळत आहे.

रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष तीव्र झाला असताना शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं गायकवाड म्हणाले होते.

दरम्यान, संजय गायकवाड यांच्या टीकेचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘’संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लव्हज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो,’’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.