Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदुषीत पाणी प्रश्नी आजरा नगरपंचायतीत महिलांचा गोंधळ.

दुषीत पाणी प्रश्नी आजरा नगरपंचायतीत महिलांचा गोंधळ.

आजरा:-प्रतिनिधी.

आजरा येथील दर्गा गल्लीत पिण्याचे पाणी दूषित येत असून महिन्याभरापासून हा प्रकार चालू आहे.आज येथील महिलांनी थेट नगरपंचायत गाठली. नगरपंचायती कडे नागरिकांनी तक्रारी करून देखील पिण्याच्या पाण्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. पाणीपट्टी कशासाठी भरायची?असा प्रश्न नगरपंचायती मध्ये महिलांनी उपस्थित केला.
या दुषित पाण्यामुळे
नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो तरीदेखील नगरपंचायत मूलभूत गरजांपैकी पिण्याच्या पाणी प्रमुख गरज असताना आरोग्य विभाग, नगरसेवक व कर्मचारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे नगरपंचायतीवर नागरिकांची तीव्र नाराजी आहे. आजरा येथील नागरिक नगरपंचायतीच्या टेबलवर दूषित पाण्याचा अभिषेक करण्यासाठी महिला आल्या होत्या. पण आजरा नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक संजय यादव यांनी नागरिकांची समजूत काढत लवकरच दूषित पाणी बंद होऊन चांगले पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नौंशाद बुड्डेखान यांच्यासह महिलांनी नगरपंचायत कार्यालयात दुषित पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन हे पाणी तुम्ही प्या अशी कर्मचाऱ्यांना आग्रह धरला. अखेर यादव यांनी उद्यापासून दुषित पाणी येणार नाही असे सांगितल्यानंतर नगरपंचायतीमधून महिलानी स्वच्छ पाणी न आल्यास पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.