आजरा अर्बन बँक शाखा तारळेकडे एटीएम सेवेचा शुभारंभ.- पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी आजरा अर्बन बँकेने एक पाऊल पुढे.
आजरा. – प्रतिनिधी.
तारळे पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी आजरा अर्बन बँकेने एटीएम सुरू केले असून बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत व बँकेच्या संचालिका श्रीमती शैला टोपले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच तारळे गावचे सरपंच अशोक कांबळे संजयसिंग पाटील माजी चेअरमन भोगावती साखर कारखाना, दत्तात्रय पाटील माजी सभापती राधानगरी पं. स. शिवाजी पाटील माजी संचालक भोगावती साखर कारखाना, प्रतिष्ठित नागरिक संग्राम पाटील, मानसिंग पाटील अॅ. उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सदरच्या एटीएम सेंटर मुळे तारळे गावातील व तारळे परिसरातील सर्व ग्राहकांची सोय होणार असून येथे सर्व बँकेचे एटीएम कार्ड चालणार आहेत. त्यामुळे सभासदांना व अन्य नागरिकांना कधीही रक्कम मिळण्याची सोय होणार आहे. एटीएम सेंटर उद्घाटन प्रसंगी श्री चराटी यांनी बँकेकडे असणाऱ्या ठेवी कर्ज तसेच एकूण व्यवसायाची माहिती दिली तसेच बँकेमार्फत ग्राहकांना पुरवीत असलेल्या सेवेची ही माहिती दिली असून बँकेला लवकरच शेडूल दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले सदरच्या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, व्हा.चेअरमन किशोरी भुसारी, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर रमेश कुरणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिती केसरकर श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनीस, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅ. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे शाखा मार्गदर्शक आनंद तेली, गजानन पोतदार, राहुल वणकुद्रे, राजाराम पोतदार, विजय महाजन, राजाराम भाटले, दत्तात्रय नील्ले, मारूती पारकर, ज्योतीराम सूर्यवंशी पाटील, सदाशिव पाटील रवींद्र जाधव, तारळे गावातील प्रतिष्ठित नागरिक ठेवीदार कर्जदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.