गुणवंत व्यक्तींच्या कार्याचा गौरव.- प्रोत्साहन मिळावे हा उद्देश संवेदना फाऊंडेशन. – संवेदना कमल पुरस्कार २०२२ सोहळा संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील गुणवंत व्यक्तींच्या कार्याचा गौरव करुन प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने संवेदना फाऊंडेशन आजराने ‘संवेदना कमल पुरस्कार’ सोहळ्याचे नियोजन ६ मे २०२२ रोजी न्यू बजरंग व्यायाम शाळा पटांगण हात्तिवडे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संवेदनाचे कार्यकारी सदस्य जयवंत पन्हाळकर होते. क्राॅ. संपत देसाई यांच्या शुभहस्ते वितरण सोहळा संपन्न झाला. प्रस्ताविक संवेदना फाउंडेशनचे तानाजी पावले यांनी केले. संवेदना फाउंडेशन कमल पुरस्कार बाबत कार्यक्रमाचा आढावा यावेळी संवेदनाचे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांनी मांडला संवेदना फाउंडेशन कमल पुरस्कार समिती यांनी समाजकार्य , आरोग्यसेवा, विज्ञान, कृषी, शिक्षण, कला व क्रिडा या सात विभागासाठी नामांकने मागविण्यात आली होती. समस्त आजरेकरांनी या पुरस्कारासाठी भरभरून प्रतिसाद दिला. यातुन संवेदनाच्या निवडसमितीने सखोल अभ्यास करुन प्रत्येक क्षेत्रासाठी तीन ते पाच नावं निवडली होती. १ मे महाराष्ट्र दिनादिवशी ही निवडक नामांकने लोकांसमोर ठेवली गेली होती. या पुरस्कार वितरण सोहळ्यात नामांकीत व्यक्तीमधुन अंतिम विजेत्यांना मानपत्र, ग्रंथ भेट,आदी.देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. .
‘संवेदना फाऊंडेशन ला पाच वर्षे पुर्ण होत आहेत. या पाच वर्षात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून संवेदनाने जनमाणसांत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परिवर्तनाच्या या चळवळीला साजेसे काम करणाऱ्या प्रत्येकाचा गौरव करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. संवेदना कमल पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातुन एकच विजेता निवडला असला तरी नामांकित झालेली ही सगळी मोठी माणसं आमच्यासाठी वंदनीय आहेत’ असे मत संवेदना फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व निवड समितीचे प्रमुख पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केले. संवेदनाचे कार्यकारी सदस्य श्री. पन्हाळकर यांच्या संकल्पनेतुन मातोश्री कै. कमळाबाई पन्हाळकर स्मृती प्रितर्थ संवेदना कमल पुरस्कार साकार करण्यात आला आहे. निवड झालेल्या पुरस्कार मुर्ती ची नावे खालीलप्रमाणे आहेत.
सामाजिक क्षेत्र. -गीता पोतदार, आरोग्य क्षेत्र डाॕ.रश्मी राऊत,
कृषी क्षेत्र – .संभाजी सावंत,
विज्ञान क्षेत्र -डाॅ.जयवंत गुंजकर,
शिक्षण क्षेत्र – डाॕ.मारूती डेळेकर,
कला क्षेत्र- प्रदीप शिवगण, क्रीडा क्षेत्र -गुरुनाथ मोरे., संवेदना विशेष सत्कार – संभाजी अस्वले सी. ए., सतीश कुंभार हात्तिवडे. , विश्वास हरेर. हात्तिवडे. यांना संवेदना गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी काॕ. संपत देसाई प्रमुख पाहुणे होते. तर रामकुमार सावंत जेष्ठ नागरिक संघटना, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजिवनी सावंत, आजरा साखर चेअरमन सुनील शिंत्रे, मानसिंगराव देसाई , शंकुतला सुतार सरपंच,प्रमिला पाटील उपसरपंच सुमित चंद्रमणी शिक्षण विस्तार अधिकारी, न्यू विजय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष मधूकर कुंभार ,सचीव कृष्णा खाडे,संवेदना सदस्य, समस्त हात्तिवडेकर ,आजरेकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन मगदूम सर तर आभार संतराम केसरकर सर यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संवेदना फाउंडेशन चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
