Homeकोंकण - ठाणेऔरंगाबादमध्ये ठाकरी तोफ धडाडणार.- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

औरंगाबादमध्ये ठाकरी तोफ धडाडणार.- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

औरंगाबादमध्ये ठाकरी तोफ धडाडणार.- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

औरंगाबाद :- प्रतिनिधी.

औरंगाबादमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज गर्जनेची तयारी जोरदार करण्यात आली आहे. भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

👉आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिका-यांचा ताफा मागवला आहे. तर सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

👉मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होत असलेल्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे.

👉सभेआधी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभा उधळून देण्याचा इशारा काही संघटनांनी दिल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.

👉या मार्गावर राहणार वाहनबंदी

➖जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळी बाग

➖आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट

➖ज्युबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता

➖आशा ऑप्टिकल ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता

👉पर्यायी मार्ग कोणते?

➖मिलकॉर्नर ते भडकल गेट

➖मिलकॉर्नर ते महात्मा फुले चौक औरंगपुरा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.