आजरा गवसेत अंगणवाडीतील – नव्या विद्यार्थ्यांचे केले स्वागत. ( अंगणवाडी क्र. १४ व १५ चा उपक्रम.)
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील गवसेत येथील अंगणवाडी क्र. १४ व १५ या अंगणवाडीतील विद्यार्थी व नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोणाकाळात अंगणवाड्या बंद होत्या. सद्या अंगणवाड्या सुरू करत असताना येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना उत्साह वाढावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. अलीकडे काही पालक आपले विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे जास्त कल असतो पण आपली ( मुल) विद्यार्थ्यां आपल्या जवळच्या अंगणवाडी कडे पाठवत असतात आपलेही लक्ष राहत. तर आम्ही देखील येणाऱ्या विद्यार्थ्याकडे पालक म्हणूनच सांभाळ करत असतो. तरी आपल्या मुलाला अंगणवाडीमध्ये पाठवावे शासनाच्या विविध योजनेचा लाभ व अंगणवाडीत आवड सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी आम्हाला आपले मुलांना पाठवून सहकार्य करावे असे मत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी क्र. १४ च्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत अंगणवाडी सेविका रंजना सुतार यांनी केले तर अंगणवाडी क्र. १५ येथील विद्यार्थ्यांचे सुमन यादव व सुमन कांबळे यांनी केले