Homeकोंकण - ठाणेअटल टिंकरिंग लॅब व श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा...

अटल टिंकरिंग लॅब व श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न.

अटल टिंकरिंग लॅब व श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा हायस्कूल आजरा येथील अटल टिंकरिंग लॅब व श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर आजरा यांच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे प्रमुख पाहुणे म्हणून होते. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आजरा संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी होते. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष श्री घाटगे म्हणाले आजरा सारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्था निर्माण करून त्या चांगल्या पद्धतीने चालवणे हा एक चांगल्या नियोजनाचा भाग आहे. भविष्यात आम्हाला आणखी शिक्षण संस्था निर्माण करत असताना आपले मार्गदर्शन घ्यावे लागेल.

चौकट.
[ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यानंतर शिक्षण या विषयावर मला अधिक काम करायचे आहे. सर्वसामान्य जनतेला परवडेल आशा पद्धतीचे शिक्षण देण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी स्वतःलाच भावी आमदार असे संबोधले . ]

अण्णाभाऊ संस्था समूहाचे खरोखरच काम प्रेरणादायी आहे. कारण संस्थेमध्ये राजकारण न आणता पारदर्शकपणे संस्था चालवतो ती संस्था चांगल्या पद्धतीने चालते यापेक्षाही चांगल्या पद्धतीने संस्था चालण्यासाठी आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत असल्याचे श्री घाटगे आणि शेवटी बोलताना सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले विद्यार्थ्यांचे आई वडीला नंतर प्रमुख मार्गदर्शक कोण असतील तर ते शिक्षक आहेत. शिक्षकच विद्यार्थी घडवू शकतात आमच्या शिक्षण संस्थेमध्ये या सर्व शिक्षकामुळे संस्था नावारूपाला आलेल्या आहेत. कोरोणा काळात विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते भरून काढण्याची जबाबदारी त्या त्या शिक्षण आवक होती तेही चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचे काम चालू आहे. जुन्या अण्णाभाऊ त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व संचालकांचे मार्गदर्शन घेऊन मी काम करत असतो. यामुळे सर्व जुने सहकारी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही. यामुळे या संस्था सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू आहेत.
आजरा साखर कारखाना मध्ये मी कमी पडलो कारण विरोधकांच्या अडचणीत वाढ होत. गेली व विरोधकांनी अडचणीत आणले पुढील निवडणुका अडचणीच्या जाणार नाहीत असेही बोलताना श्री चराटी म्हणाले.
या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जी. येसने मुख्याध्यापक आजरा हायस्कूल यानी केले तर स्वागत विजयकुमार पाटील, सुत्रसंचालन सौ. टि. एस. पाटील यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा जोस्त्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, अण्णाभाऊ सूतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी, डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष विलास नाईक, सचिव र. गु. कुरुनकर, संचालक सुरेश डांग, दिनेश कुरुनकर, डॉ. दिपक सातोस्कर,मारुती मोरे, कृष्णा येसने तसेच योगेश पाटील, अनिकेत चराटी आजरा हायस्कूल , आजरा महाविद्यालय जुनिअर कॉलेज सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी आदी उपस्थित होते. आभार सौ नीलांबरी कांबळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.