रामतीर्थ आजरा.- मधमाशांच्या हल्ल्यात ५० जण जखमी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा रामतीर्थ येथे हनुमान जयंतीनिमित्त आजरा येथील व परिसराच्या गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आज दि. १६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास मधमाशाच्या पोळ्याला लहान मुलांनी दगड मारला असावा असा संशय व्यक्त केला जातो. महाप्रसाद सुरू असल्याच्या ठिकाणापासून जवळच असणाऱ्या आवारातुन मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला या मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे ५० हून अधिक भक्तावर अचानक या मधमाशीने केलेल्या हल्ल्यामुळे गोंधळ उडून गेला या हल्ल्यात दिनेश कुरुनकर शेखर कुरुकर, सुधीर बळीराम कुंभार, अभिषेक टंगसाली, सुुवर्णा नाईक, स्नेहल नाईक, धनश्री नाईक, यांच्यासह जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
