Homeकोंकण - ठाणेभादवण विकास सेवा सोसायटी निवडणुकी शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचा नऊ...

भादवण विकास सेवा सोसायटी निवडणुकी शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचा नऊ जागांवर विजय. – तर सत्ताधारी आघाडीला तीन जागा. १०२ वर्षापूर्वीची संस्था.

भादवण विकास सेवा सोसायटी निवडणुकी शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचा नऊ जागांवर विजय. – तर सत्ताधारी आघाडीला तीन जागा.

आजरा. – प्रतिनिधी. १५

भादवण ता. आजरा येथील दि.१४ रोजी झालेली विकास सेवा सोसायटी निवडणुकी चुरशीची व अटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचा नऊ जागांवर विजय मिळवत विकास सेवा संस्थेवर एक हाती सत्ता देण्यात यश मिळाले आहे.१०२ वर्षापूर्वीची असलेली ही संस्था या संस्थेमध्ये मागील अनेक वर्ष विरोधकांची सत्ता होती या सत्य मध्ये सत्तांतर करण्यास २०२२ सालात यश मिळाले आहे. या निवडणूक प्रचार दरम्यान मागील पंधरा दिवसांमध्ये दोन्ही आघाडीमध्ये प्रचार यंत्रणा मतदार गाठीभेटी घेत प्रचाराला रंगत आणली होती. विकास सेवा संस्थेमधून आपली सत्ता आल्यास आपण शेतकऱ्यांसाठी काय करणार हा विषय बाजूलाच राहून गेला असल्याचे या निवडणुकीत चित्र दिसत होते. उमेदवारांच्या नेत्याकडून विकास सेवा संस्थेकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे लाभ यापेक्षाही वेगळी कामे, लाभ देण्याची आमिषे मतदारांना दाखवण्यात आली होती. यामुळे मतदारांच्या भावना दुखावल्या गेल्या, प्रचाराचा मुद्दा बाजूला सोडून तरुण पिढीला दिशाहीन करण्याचे काम या निवडणुकीच्या प्रचारातून मतदारांचा लक्षात येत होते. अशी चर्चा काही मतदारांच्या मध्ये केली जात होती. अशा काही प्रचाराच्या दरम्यान घडलेल्या घटना व विजय पॅनलचा जाहीर केलेला जाहीरनाम्याला मतदारांनी पसंती दाखवली.म्हणून विकास सेवा संस्थेमध्ये शिवसेना प्रणित युवा शेतकरी पॅनलला नऊ जागांवर विजय मिळवता आला असल्याची चर्चा आहे.
विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार असे.
युवा शेतकरी विकास पँनेल . –
१) कुंभार रत्नपा गणपती २) पांडुरंग कोंडीबा केसरकर ३) डोंगरे दशरथ धोंडिबा ४) देसाई मारुती ईश्वर
५) पाटील दत्तात्रय अंबाजी ६) केसरकर रत्नाबाई केदारी ७) पाटील रुक्मिणी तुकाराम ८) गुरव अशोक रामचंद्र ९ ) कांबळे संभाजी विठोबा तसेच
शेतकरी महाविकास आघाडी . –
१) गोपाळ हरी केसरकर, २) गाडे गजानन यल्लपा, ३)जोशीलकर पांडुरंग रामचंद्र. अशी विजयी उमेदवारांची नावे असून शिवसेना प्रणित युवा शेतकरी पॅनलचे सर्वत्र कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.