भुजबळांच्या भेटीवरून मराठा क्रांती मोर्चाची नाराजी, संभाजीराजे म्हणाले. पहा सह्याद्रीवर
अहमदनगर : – प्रतिनिधी. ०५
‘बहुजनांना एकत्र करण्याचा विचार शाहू महाराजांनी दिला आहे. सहा मे रोजी शाहू महारांजाची स्मृति शताब्दी आहे. त्यासंबंधी मी मंत्री यांची भेट घेतली. बहुजन समाजाला एकत्र ठेवणे माझे कामच आहे,’ अशा शब्दांत खासदार यांनी भुजबळ यांच्या भेटीचे समर्थन केले. संभाजीराजे मंगळवारी नगरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळ यांच्या भेटीत काही चुकीचे नसल्याने सांगितले. ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी नाशिकमध्ये मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. “मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत” असे सांगत त्यांनी भुजबळ यांचे कौतुकही केले होते. मात्र, यावरून मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे यांनी नाराजी व्यक्त करताना भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप करून त्यांना भेटून संभाजीराजेंना काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आरोपांवर पत्रकारांनी संभाजीराजेंना प्रश्न केला. ‘सर्वांच्या प्रतिक्रियांचे मी उत्तर देऊ शकत नाही. मात्र मला एवढेच माहिती आहे की, मराठा आरक्षणासाठी जेव्हा नाशिकमध्ये मूक आंदोलन झाले होते, तेव्हा भुजबळ तिथे आले होते. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे ते बोलले होते. बहुजनांना एकत्र करण्याचा विचार शाहू महाराजांनी दिला आहे. सहा मे रोजी शाहू महारांजाची स्मृति शताब्दी आहे. त्यासंबंधी मी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. बहुजन समाजाला एकत्र ठेवणे माझे कामच आहे,’ असेही संभाजीराजे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना अजानच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून त्याविरोधात हनुमान चालिसा लावण्याची भूमिका जाहीर केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. यासंबंधी संभाजीराजे यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘राज ठाकरे त्यांची भूमिका घेतील, त्यावर मी कशाला भाष्य करू? मराठा आरक्षणाच्या विषयावर आमचा पाठपुरावा सुरूच आहे. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. बाकीच्या प्रत्येक राजकीय गोष्टीवर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही,’ असे संभाजीराजे म्हणाले.