कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात माहेरच्या लेकीसाठी प्रचारला धावणार. – आजरा टीम सतेज. – पत्रकार परिषदेत दिली माहिती.
आजरा. – प्रतिनिधी. ०४
कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात माहेरच्या लेकीसाठी प्रचारला आजरा टीम सतेज जाणार असून आजरा तालुक्यातील कोल्हापूर येथे असलेले रहिवासी व उत्तर मतदार संघातील मतदार संपर्कात असून त्यांनी प्रचारात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान तमाम आजरेकरांनी केले आहे. अशी माहिती आजरा काँग्रेस नगरसेवक व टीम सतेज पदाधिकारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव ह्या आमच्या आजऱ्यातील लेक असून यांच्या कोल्हापूर उत्तर मधील प्रचारासाठी मोठ्या संख्येने जाऊन मदत करणार असल्याचे टीम सतेज पदाधिकारी यांनी यांनी सांगितले व तमाम आजऱ्यातील कोल्हापूर येथे रहिवासी असलेल्या नागरिकांनी संपर्क करावा असे अवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी नगरसेवक किरण कांबळे , अभिषेक शिंपी, तसेच अमित खेडेकर, इम्रान सोनेखान, विलास पाटील, बशीर खेडेकर, विक्रम पटेकर सह आजरेकर बांधव व टिम सतेज पदाधिकारी उपस्थित होते.
