देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजन इंधनावर कार. – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केला प्रवास.
नवी दिल्ली. वृत्तसंस्था.
देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर (Green Hydrogen Fuel) चालणारी कार धावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या कारमधून संसदेत दाखल झाले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय असून याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आज त्यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून घरापासून तर संसदेतपर्यंत प्रवास केला. बाजारात तेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन चांगला पर्याय आहे. ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निघणारं हायड्रोजन. त्यावर गाडी सहज चालतेय. याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल. मथुरामध्ये देखील आम्ही सांडपाण्यावर प्रयोग केले आहेत. देशातील महापालिकेत असणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर उपाय शोधून आम्ही स्वच्छ इंधन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण इंधनामध्ये देखील स्वावलंबी व्हायला पाहिजे, असं नितीन गडकरी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले. (Nitin Gadkari Travel in Green Hydrogen Car)
केंद्र सरकारने ३००० कोटी रुपयांचे मिशन सुरू केले असून देश हायड्रोजन निर्यात करणार देश बनेल. जिथं कोळशाचा वापर होतो तिथं ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर होईल. ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन वापरण्याचं ठरवलं आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल. आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी व्यक्त केला.
{ परंतु या देशाला बायो सीएनजी शिवाय पर्याय नाही. देशाला प्रदूषण मुक्त करायचं असेल तर जमिनीवर तयार होणारा सीएनजी गॅसची देशाला गरज आहे. यामुळे देश सुजलाम सुफलाम होईल व प्रदूषण मुक्त इंधन, कॅन्सर मुक्त देश होईल. व देशातील 70 टक्के शेतकरी वर्गाला हाताला काम मिळेल}