Homeकोंकण - ठाणेदहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान - २ विषयाचा पेपर फुटल्याचे वृत.- कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे घटना.-...

दहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान – २ विषयाचा पेपर फुटल्याचे वृत.- कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे घटना.- पहा सविस्तर वृत.

दहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान – २ विषयाचा पेपर फुटल्याचे वृत.- कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे घटना.- पहा सविस्तर वृत.

कोल्हापूर. – प्रतिनिधी.

दहावीची बुधवारी होत असलेल्या . विज्ञान-तंत्रज्ञान – २ विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथील एका पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेतून प्रश्नपत्रिका बाहेर फुटल्याची बाब तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या पेपरफुटीला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

बुधवारी ३० मार्च रोजी विज्ञान-तंत्रज्ञान २ या विषयाची परीक्षा होत आहे. याच्या एक दिवस आधी मंगळवारी उशिरा हा पेपर फुटल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. केवळ पाचशे रुपयांना या पेपरची विक्री झाल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पेपरफुटीस जबाबदार शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, या सर्व घटनेचे गांभीर्य ओळखत जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कस्टडी असणारे शाळेत धाव घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.