Homeकोंकण - ठाणेचक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी.- पोलिस आयुक्तांनी असा रचला सापळा…

चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी.- पोलिस आयुक्तांनी असा रचला सापळा…

चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी.- पोलिस आयुक्तांनी असा रचला सापळा…

पुणे – प्रतिनिधी. २९

आयर्नमॅन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी त्यांच्या नावाचा वापर करुन अनेक गैरव्यवहार करणारा आणि खंडणी मागणाऱ्याला बेड्या ठोकण्यासाठी कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. या कौतुकास्पद कारवाई वेळी काही ठराविक पत्रकार ही तिथं पोहचले होते. कारवाईसाठी केलेल्या वेशभूषेत पोलीस आयुक्त प्रकाश यांनी फोटोसेशनही केलं. आरोपीला बेड्या ठोकण्यात यश येताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मिशिवर ताव मारायलही विसरले नाहीत.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांचे नाव ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो. याच नावाचा फायदा घेण्याचं नाशिकच्या रोशन बागुलने ठरवलं. यासाठी रोशनने बनावट आयडी कार्ड बनवलं होतं. एका बाजूस महाराष्ट्र पोलीस असा तर दुसऱ्या बाजूला सायबर क्राईमचा उल्लेख होता. त्यावर रोशनचा फोटोही होता. हेच आयकार्ड दाखवून त्यानं पिंपरी चिंचवडमधील एका घर मालकाला धमकावले. तर दुसऱ्या व्यक्तीला जमिनीचा व्यवहार करून देतो असं म्हणाला.

या दोन्ही प्रकरणात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी ओळख असल्याचं तो म्हणाला. जमीन व्यवहारात त्यांनी मदत केली नाही तर त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटलांकडून करून घेऊ, असं आश्वासनही त्यानं दिलं. यासाठी पैशाची मागणी रोशनने केली. ही बाब पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या कानावर पडली. मग त्याला धडा शिकविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेशांतर करायचं ठरवलं.

त्यानुसार पोलीस आयुक्त प्रकाशांनी सामान्य व्यक्तीची वेशभूषा केली. मग निगडीतील एका हॉटेलमध्ये रोशनला बोलविण्यात आले. तिथं स्वतः कृष्ण प्रकाश सामान्य व्यक्तीच्या वेशभूषेत दाखल झाले. सगळी बोलणी झाली, पैसे ही द्यायचे ठरले. पण वरची नोट वगळता खालच्या सर्व नोटा नकली असल्याचं कळताच रोशनचे बिंग फुटले. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. रोशनला अटक करताच आयर्नमॅन पोलीस आयुक्त प्रकाशांनी मिशिवर ताव हाणला. या प्रकरणी रोशनसह गायत्री बागूल आणि पूजा माने अटकेत आहेत. तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे.
या स्टिंग ऑपरेशनसाठी कृष्ण प्रकाशांनी जी वेशभूषा केली होती, त्याचं फोटोसेशन ही करण्यात आलं. कौतुकास्पद कारवाई असल्याने फोटो सेशन करण्यात काहीच गैर नव्हतं. अगदी स्टिंग ऑपरेशन यशस्वी झालं तेव्हा काही ठराविक पत्रकारही तिथं पोहचले. त्यांनी हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. तेव्हा मिशिवर ताव मारायला कृष्ण प्रकाश विसरले नाहीत. याआधीही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणि नाके बंदीवर जाऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यावेळी एक पत्रकार सोबत होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून आधी पोलिसांची परीक्षा घेतली तर आता थेट आरोपींच्या मुसक्या आळवल्या. त्यामुळे या गोष्टीचं कौतुक आणि अनुकरण ही नक्कीच करायला हवं. पण ते वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन करत असतानाच प्रसारमाध्यमं तिथं कशी काय पोहचतात? अशी चर्चा ही शहरात रंगली
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.