मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गोव्याच्या घेतली शपथ.
पणजी. – प्रतिनिधी. २८
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती.
आज, सोमवारी (दि.२८) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमममध्ये सकाळी ११ वाजता होत आहे. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व असा झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १८ दिवस झाले. देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत भाजपाने यश मिळवले. संपूर्ण देशासह गोव्यात होणारा शिगमोत्सव आणि होळी यामुळे इतर राज्यांतील शपथविधी सोहळा थोडा विलंबाने पार पडला.