उचंगी प्रकल्पाच्या कुशीत चाफवडेच्या डाव्या तिरावर लोकसहभागातून आकार घेतंय एक नविन गाव. – सरपंच विलास धडाम यांचा पाठपुराठा
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील उंचंगी प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे म्हणून चंदगड विधानसभेचे आम. राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने चाफवडे येथील नविन वसाहतीस ( आदर्श वसाहतीस ) जलजीवन मिशन योजने अंतर्गत ५८ लाखांची न.पा.पू. योजना व संपुर्ण वसाहतीस ९२ पोलच्या थ्रीफेज, घरगुती व स्ट्रीट लाईट योजनेस महावितरण व जिल्हा नियोजन समितीकडून १८ लाख रुपये असा एकून ७६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून जून पर्यंत दोन्ही कामे पुर्ण होतील, अशी माहिती सरपंच विलास धडाम यांनी दिली.
उचंगी प्रकल्पामुळे गावकऱ्यांना विस्थापित उचले लोक ही ब्रिदावली न लावू देता आपल्याच मातीत आपण वसवू आपले सुंदर गाव.
या संकल्पनेतून दुरदृष्टी ठेवून ५ वर्षे अफाट मेहनत घेऊन
शेतकऱ्यांना संघटीत करून नविन गावची संकल्पना ग्रामस्थांच्या मनात रूजवून तब्बल २० एकर शेत जमिनीमध्ये नियोजनबद्ध लेआऊट प्लॅन आखून १५० निवासी भूखंडाची, रूंद रस्ते व मुबलक सार्वजनिक जागेंसह नविन वसाहत उदयास आणली आहे. सरपंच श्री. श्री. धडाम, नविन गाव नियोजन कमिटी अध्यक्ष पांडूरंग धडाम, हायकोर्ट वकील, अॅ विजय धडाम, तुकाराम गुरव, संजय गावडे, जानबा धडाम आदींसह ग्रामस्थ व तरूण वर्गाने खूप मेहनत घेतली आहे. डाव्या तिरावरील शेतकऱ्यांनी विनामोबदला आपली शेत जमिन देऊन खूप मोठा त्याग केला आहे.
प्रकल्पात येत्या जूनमध्ये पाणीसाठा झाल्यानंतर चाफवडे गावचा डाव्या तिरापासून पुर्णपणे संपर्क तुटणार असून डाव्या तिराचा नैसर्गिक चर्तुसिमांसहीत स्वतंत्र भु – भाग निर्माण होणार आहे.
थोड्याच दिवसांत आमदार राजेश पाटील मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या स्वतंत्र भु – भागास नविन महसूल गाव घोषीत करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रशासनाकडून समाधानकारक सहकार्याची गरज आहे. तरच कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या गाव वस्ती चे काम मार्गी लागेल.
