Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र सुळेरान ग्रुप ग्रामपंचायतला पालकमंत्री नाम. प्रकाश अबिटकर यांची सदिच्छा भेट.- वन्य प्राणी,...

सुळेरान ग्रुप ग्रामपंचायतला पालकमंत्री नाम. प्रकाश अबिटकर यांची सदिच्छा भेट.- वन्य प्राणी, कृषी, राष्ट्रीय महामार्ग, विविध विषयांवर चर्चा..

oplus_131074

सुळेरान ग्रुप ग्रामपंचायतला पालकमंत्री नाम. प्रकाश अबिटकर यांची सदिच्छा भेट.- वन्य प्राणी, कृषी, राष्ट्रीय महामार्ग, विविध विषयांवर चर्चा..

आजरा.- प्रतिनिधी.

oplus_131074

आजरा तालुक्यातील सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत येथे दि. ०४/०८/२०२५ रोजी पहाटे ०६: ३० वाजता पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी येथील नागरिकांच्या विविध समस्या यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान, राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा गटर्स, वनविभागाच्या वन्य प्राण्यांचे गावामध्ये येऊन व शेतामधील होणारे नुकसान याकडे वनविभागाचे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नाबाबत पाहणी व चर्चा ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री. अबिटकर यांच्याशी सरपंच व सदस्य, ग्रामस्थ यांनी केली.

अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान याबाबत कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासमोर पिकांची पाहणी करून पंचनामे करावे व काडीमोल नुकसान भरपाई न देता योग्य ती नुकसान भरपाई मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच वन्यप्राण्यापासून पिकांचे होणारे नुकसान याबाबत ठोस वन्यप्राण्यांची उपाययोजना करून याबाबतची नुकसान भरपाई व वन विभागाचे वन्य प्राणी ते त्यांनी सांभाळावे वनविभागाच्या येथील असलेल्या कार्यालयासमोर वन्य प्राणी (हत्ती) आला तरीही वनविभागाचे कर्मचारी कार्यालयातून बाहेर येत नाहीत. आज रोजी विविध समस्या बाबत पालकमंत्री सुळेरान येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारात आले तरी देखील वनविभागाचे कर्मचारी बाहेर आलेले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.

oplus_131074

तसेच राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा मारलेला चर या ठिकाणी गटर नसल्यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी जात आहे. ताबडतोब याबाबत संबधित विभागाने दुतर्फा गटरचे काम ताबडतोब करावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. याबाबत पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत प्रशासनाने वरील विषयाबाबत आमचे झालेले नुकसान, करमाफी व कर्जमाफी व्हावी अन्यथा आम्ही सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेऊ. विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी आमच्या विविध समस्यांची येऊन पाहणी केली याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद, परंतु पाहणी केलल्या विषयावर मार्ग मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार समीर माने कृषी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.‌

यावेळी सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे उपसरपंच, ग्रामसेवक सुर्यकांत जाधव, जयश्री पाटील व सदस्य मायकल बारदेस्कर तसेच गोविंद पाटील, जयसिंग पाटील, सुरेश पाटील, तानाजी जाधव, आनंदा शेटगे, संग्राम पाटील तसेच किटवडे सरपंच लहू वाक्कर, दाभील सरपंच युवराज पाटील, जयवंत पाटील, बाबुराव पाटील, विष्णू पाटील, मनोहर पाटील, दिंगबर पाटील, दिलीप खरुडे, सुधाकर प्रभू, निवृत्ती यादव उपस्थित होते. उपस्थितांचे सरपंच श्री. कांबळे यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.