🛑’एक राखी वीर जवानांसाठी.- ग्रामपंचायत सोहाळे बाची / प्राथमिक विद्यामंदिर..यांचा उपक्रम.
🛑शहिद अब्दुल हमीद संस्थेच्या चेअरमपदी अबूताहेर तकीलदार तर व्हा. चेअरमपदी इब्राहिम नसरदी यांची बिनविरोध निवड.
‘एक राखी वीर जवानांसाठी.- ग्रामपंचायत सोहाळे बाची. प्राथमिक विद्यामंदिर .यांचा उपक्रम.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील सोहाळे / बाची, ग्रुप ग्रामपंचायत व प्राथमिक अनंत विद्या मंदिर सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने अनोखे रक्षाबंधन एक राखी वीर जवानांसाठी हा अनोखा उपक्रम अंतर्गत आज मौजे सोहाळे येथील श्री. महालक्ष्मी देवालंय येथे ग्रामपंचायत सरपंच सौ. भारती डेळेकर यांचे मार्गदर्शन खाली सीमेवरील जवानासाठी राखी बांधणेसाठी स्वतःचे हाताने राखी बनविण्याची मोहीम स्थानिक महिला बचत गट व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनी यांचे मदतीने राबविण्यात आली.
सोहाळे गांवातील महिला बचत गट व शाळेतील विद्यार्थिनी यांनी स्वतःचे हाताने तयार केलेल्या राख्या बांधणेसाठी भारतीय सैन्य दलातील उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील मराठा बटालियन मधील जवानांसाठी पोष्टाने पाठविणार आहेत. त्या ठिकाणी आजरा भागातील कार्यरत जवानांचे कुटुंबीय ग्रामपंचायत सोहाळे येथील महिला व विद्यार्थी यांनी पाठविलेल्या राख्या जवानांना बांधुन रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरे करणार आहेत. हा उपक्रम राबविने कामी सौ. भारती डेळेकर (सरपंच सोहाळे), सौ. निशा देसाई, सौ. सुनीता पाटील, सौ. सुप्रिया दोरुगडे, सौ. संगीता कोंडुसकर, सौ. सुमन दोरुगडे, सौ. गीता देसाई, सौ. मेघा देसाई (समन्व्यक बचत गट) आदिनी विशेष परिश्रम घेतले.
🛑शहिद अब्दुल हमीद संस्थेच्या चेअरमपदी अबूताहेर तकीलदार तर व्हा. चेअरमपदी इब्राहिम नसरदी यांची बिनविरोध निवड.
आजरा :- प्रतिनिधी

शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्था मर्या. सावरवाडी या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधिकारिता संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकातून चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी अबूताहेर तकीलदार तर व्हा. चेअरमन पदी इब्राहिम नसरदी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
शहीद अब्दुल हमीद विकास सेवा सोसायटी मर्या. सावरवाडी या संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड करताना संस्थेच्या चेअरमन पदासाठी अबूताहेर तकीलदार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले व छाननी अंती वैध असलेने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. यावेळी युसूफ अब्दुल भडगावकर यांनी नाव सुचविले तर बाबू इब्राहिम लतीफ यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदी इब्राहिम नसरदी यांचे नाव बशीर नजबुद्दीन लतीफ यांनी नाव सुचविले तर यास प्रकाश कांबळे यांनी अनुमोदन दिले. ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी जे. एन. बंडगर यांचे अध्यक्षतेखाली संस्था कार्यालय येथे पार पडली. यावेळी अबूताहेर तकीलदार म्हणाले की, संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने संस्था फायद्यात आणणे अवघड होत आहे.
सभासदांना लाभांश देता येत नाही. दरवर्षी शंभर टक्के वसुली असून एक आदर्श संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. पदरमोड करून संस्था चालवली जात आहे. यासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून सभासदांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याकडे आम्ही सर्वजण लक्ष केंद्रित करणार आणि संस्थेच्या हितासाठी निःस्वार्थपणे काम करणार. माझे सभासद सहकारी झाकीर आगलावे यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बशीर तकीलदार, युसूफ भडगावकर, युसूफ खेडेकर, कुदरत लतीफ, नियाज तकीलदार, बाबू लतीफ, श्रीमती.रजिया इस्माईल तकीलदार,सौ. शिंगटे, प्रकाश कांबळे, बशीर लतीफ, कैयुम बुडडेखान, आशपाक तकीलदार, साबीर तकीलदार, रेहान तकीलदार, आदिजण उपस्थित होते. शेवटी इब्राहिम नसरदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.