आजरा हालेवाडी तिट्टा बस स्थानकाची झाली श्रमदानातून स्वच्छता.
( दुर्लक्षित बसस्थानकाच्या सभोवती स्वच्छता केली मनसे पदाधिकारी यांनी.)
आजरा. – प्रतिनिधी. २०
सह्याद्री न्यूज इफेक्ट .
आजरा येथील हालेवाडी बसस्थानकाच्या सभोवती वाढलेले गवत पहाता या बसस्थानकाडे देखभाल कोणाकडे आहे. या वाढलेल्या गवताच्या विळख्यातून बस स्थानकाला बाहेर कोण काढणार अशा आशयाची दि. १९ बातमी प्रसिद्ध झाली होती. लागलीच २० रोजी हालेवाडी येथील तुषार येजरे, अमर आपके, अभिजीत पाटील, प्रशांत ढोकरे, अनिकेत पाटील अवधूत सासुलकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर विना थांबा बस स्थानकाची स्वच्छता करून एक आदर्श निर्माण केला. शालेय विद्यार्थी व प्रवासी कडक उन्हात सावली शोधण्यासाठी जातात.
एस. टी. कर्मचारी संपामुळे दुर्लक्षित होत असलेली बसस्थानके अशा बसस्थानकाकडे स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित होत होता. या फाट्यावरून तीन-चार गावचे नागरिक या बस स्थानकाचा लाभ घेतात पण बस स्थानक स्वच्छता करायला कोणालाही वेळ नाही. शालेय विद्यार्थी यांच्यासाठी तरी ही स्वच्छता करणे गरजेचे होतं परंतु असे न होता आजही हालेवाडी बसस्थानकाच्या भोवतीने तीन-चार फूट उंच वाढलेले गवत या गवताच्या विळख्यात अडकलेले बस स्थानक यातून कोण सामाजिक कार्यकर्ता पुढे येऊन या बस स्थानकाची स्वच्छता करेल का. ? असा प्रश्न उपस्थित होत असताना अखेर सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर विनाथांबा बस स्थानक स्वच्छ करून एक समाजाला वेगळी दिशा निर्माण करून दिली. हे काम खूप छोटं असले तरी याकडे अनेकांचं दुर्लक्ष झाले होत.
