निधन वार्ता.
ह. भ. प. अनंत पाटील महाराज
वडगाव ता. चंदगड. – यांचे दुःखद निधन.
चंदगड. – प्रतिनिधी. १७
वडगाव ता. चंदगड येथील ह.भ.प. अनंत गुंडू पाटील महाराज यांचे दि. १७ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या शिष्याच्या इच्छेनुसार दत्त मंदिराच्या बाजूलाच मंत्राग्नी दिला मंदिराच्या बाजूला त्यांची समाधी बांधायचे संकल्पना आहे. देव-देवता दत्त मंदिर समिती वडगाव हा ट्रस्ट करून त्यानी दत्तात्रय गणपती व मारुती अशा देवांचे भव्य असे सुंदर मंदिर बांधले आहे. या मंदिरास लागणारी दोन गुंठे जमीन त्यांनी विनामूल्य ट्रस्टच्या नावे केले आहे. मंदिराच्या समोर भव्य असा तलाव आहे अंत्यविधीसाठी यांचे असंख्य शिष्य हजार होते सदर प्रसंगी ह भ प विश्वनाथ पाटील जखेवाडी पांडुरंग तात्या सरदेसाई निंगुडगे आजरा वकील माळवीकर ट्रस्टचे सर्व सदस्य यामध्ये आजरा तालुक्यातील सदस्य नारायण मुरकुटे दाभेवाडी आजरा जनार्दन भोसले कानोली आजरा, दिग्विजय भोसले कानोली, सुनील सरदेसाई निंगुडगे आजरा युवराज सरदेसाई सुलगाव यांनी श्रद्धांजली वाहिली रक्षाविसर्जन शनिवार दि. १८ रोजी आहे त्यांच्या पश्चात पत्नी व सहा मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
