आजरा मनसेने दिला प्रशासनाला इशारा. – जीवघेणे खड्डे मुजवा. – नाहीतर वृक्षारोपण करु.
आजरा. – प्रतिनिधी. १६
आजरा शहरातील आंबोली महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे हे ताबडतोड मुजवावे अन्यथा त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून नॅशनल हायवे व्यवस्थापनाचा निषेध करण्यात येईल अशा अशयाचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. आजरा आंबोली महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले असून याकडे स्थानिक नगरपंचायतचे देखील दुर्लक्ष झालेले आहे. खरे तर या खड्ड्याचा पाठपुरावा आजरा नगरपंचायतने करायला हवा होता. परंतु असे न होता जीव घेण्या खड्याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही.
यासाठी दोन दिवसात हे जीवघेणे खड्डे बुजवले नाही तर शुक्रवार दि.१८ रोजी त्याच खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून निषेध करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे, अश्विन राणे तसेच ओमकार माडभगत, कुमार कांबळे सह पदाधिकारी मनसैनिकांची यांच्या सह्या आहेत.
