वाझे इनफेक्ट – महाराष्ट्रात ८६ पोलिसांच्या बदल्या.- यातच ६५ क्राईम ब्रँच.
मुंबईःप्रतिनिधी.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘अर्थपूर्ण’ चर्चेतून बदल्यांचे निर्णय होत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती पेन ड्राइव्हमधून केंद्रीय गृहसचिवांना दिली. या घटनेनंतर काही तासांच्या आत महाराष्ट्रात ८६ पोलिसांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. राज्य सरकारने ज्या ८६ पोलिसांच्या बदल्या केल्या त्यात ६५ पोलीस फक्त मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचमधील आहेत.
