Homeकोंकण - ठाणेगोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा. - २ मे मतदान.

गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा. – २ मे मतदान.

गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा. – २ मे मतदान.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होत आहे.
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाची आज घोषणा केली. कालच (२२ ) हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्राधिकरणाकडे पाठवला होता. गुरूवारपासून (२५ ) या निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने प्रशासकीय पातळीबरोबर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील अंतिम मतदार यादीचा महत्त्वाचा टप्पा १२ मार्च रोजी पूर्ण झाला. त्यानंतर या निवडणुकीसाठी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नावडकर यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाचा आराखडा तयार केला होता. काल ( २२ ) हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सहकार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाला मंजुरी दिली. गुरूवारपासून (२५ ) या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारीची प्रक्रिया नावडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात होणार आहे. मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण अद्याप निश्‍चित झाले नसून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या दोन्ही जागांचा शोध घेण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा :

२५ माचे ते १ एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे
५ एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी
६ एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द
६ ते २० एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
२२ एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप
२ मे – मतदान
४ मे – मतमोजणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.