आजरा साखर कारखान्याचे गाळप हंगामाची सांगता व साखर पोती पुजन कार्यक्रम संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.०८
आजरा साखर कारखान्याचा सन २०२१ – २२ चा गळीत हंगाम १२४ दिवस चालला असून ३ लाख ७४ में टन ऊस गाळप करून ४३४०५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. दि. ७ रोजी गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी कारखान्याचे संचालक अनिल फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनिता फडके या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पुजा आयोजित करणेत आली. तसेच संचालक मंडळाचे हस्ते साखर पोत्यांचे पुजन करणेत आले. सदर यावेळी व्हा. चेअरमन. मनोगत व्यक्त केले. बोलताना म्हणाले की कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली दोन वर्षे बंद असतानाही चालू हंगाम २०२१/२२ चालू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील तसेच विभागातील आमदार, विविध संस्था पदाधिकारी तर कारखाना कर्मचारी यांच्या सहकार्याने कारखाना सुरू व्हावा या हेतूने ५० टक्के पगारावर काम करण्याची तयारी दाखवून मोठ्या मोठे योगदान दिले. या सर्वांच्या सहकार्यामुळे संचालक मंडळाला कारखाना चालविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण कारखाना वेळत ताब्यात न मिळाल्याने तोडणी वाहतूक यंत्रणा भरण्यास उशीर झाला तसेच अवकाळी पाऊस झाल्याने दोन वर्षे कारखाना बंद असल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे गणितावर परिणाम झाला यामुळे ठरलेले उद्दिष्ट साध्य करता आले नाही. तरी पण संपूर्ण अडचणींना तोंड देत कारखान्याने चांगल्या पद्धतीने गाळप केले काय करता कारखान्याकडे आलेल्या उसाची बिले तोडणी वाहतूक कंत्राटदार मालक पुरवठादार त्यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत अदा केले आहे. त्यामुळे सर्व मध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यास व्यवस्थापनाची यश आले आहे. उत्पादकांनी व सभासदांनी कारखान्यावर विश्वास ठेवून आपला ऊस आमचे कारखान्यास पाठवून सहकार्य केले त्याबद्दल उत्पादकांचे तसेच तोडणी वाहतूक कंत्राटदार मालपुरवठा ठेकेदार त्यांचे आभार मानले. कारखान्याकडून असलेली बिले लवकर सादर करण्याचे नियोजन संचालक मंडळ करीत आहे. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे सदरचा सीजन यशस्वीरित्या पार पडला असून आपल्या सर्वांना सहकार्याने पुढील हंगाम पूर्ण कार्यक्षमतेने चालण्यासाठी झालेला आहे त्यासाठी सर्व ऊस उत्पादकांना हंगाम २०२२/२३ करिता आपल्या संपुर्ण ऊसाची नोंदणी नोंद आजरा कारखान्याकडे करून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे संचालक अशोक चराटी, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारुती घोरपडे, संचालिका सुनीता रेडेकर, संचालक उदयसिंह देसाई, लक्ष्मण गुडूळकर, दशरथ अमृते , राजेंद्र सावंत, मलिककुमार बुरूड, आनंदा कांबळे, तानाजी देसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक भोसले जनरल मॅनेजर गुजर मॅनेजर एस बी मल्हारी चौगुले सह कामगार संघटना अध्यक्ष सदस्य , कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष व सदस्य याप्रमाणे सर्व कर्मचारी उपस्थित होते.