Homeकोंकण - ठाणेघरेलु कामगारांच्या कामालाही कामगार म्हणून सन्मानाचा दर्जा मिळावा.

घरेलु कामगारांच्या कामालाही कामगार म्हणून सन्मानाचा दर्जा मिळावा.

घरेलु कामगारांच्या कामालाही कामगार म्हणून सन्मानाचा दर्जा मिळावा.

गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो . पण घरेलु कामगार महिलांना त्यांच्या कामाला अजुनही योग्य सन्मान मिळालेला नाही . कोविड -१ ९ च्या महामारीच्या काळात घरेलु कामगारांवर खुप मोठे आर्थिक अरिष्ट ओढवलेले होते . अचानक काम बंद झालेने आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता . संघटनेतर्फे त्यांच्या काम करणेच्या हक्काला घेऊन वेगवेगळ्या स्तरावर निवेदने देणेत आली होती . कामगार कार्यालयाकडून मागिल ४ ते ५ महिन्यापासून कोणत्याही नोंदीत महिलेला कोविड निधी ट्रान्स्फर झालेला नाही . म्हणजेच या निधीचे काम थांबल्या सारखे झाले आहे . हे सत्यात आलेले आहे . कारण शासनाने परिपत्रक काढून हा निधी थांबविलेला आहे . राज्य शासन सोबत केंद्र सरकार ही घरेलु कामगारांच्या प्रश्नाला घेऊन फारसे उत्सुक नसलेचे दिसून येत आहे . घरेलु कामगारांसाठी एक सर्व समावेशक कायदा असावा असे घरेलु कामगारांसोबत काम करणाऱ्या सर्व संघटनांचे मत आहे . I.L.O. च्या १८ ९ परिषदेमध्ये आपल्या भारत सरकारने घरेलु कामगारांसाठी कामगार म्हणून दर्जा आणि घरेलु काम हे काम हे ब्रीद घेऊन त्यांच्यासाठी कामगार कायदे करणेसाठी अनुमोदन दर्शविले होते . पण अजुन त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही . केंद्र आणि राज्य स्तरावर आपल्या कामाला सन्मान मिळावा आणि घरेलु कामगाराना कामाचा दर्जा मिळावा म्हणून घरेलु कामगार पुढे येत आहेत . ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने घरेलु कामगारांच्या प्रश्नांवर राज्य आणि केंद्र स्तरावर उहापोह करणेसाठी मा . नाम . हसन मुश्रीफसोो , कामगारमंत्री यांच्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिले . तसेच मा . उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज व मा . तहसिलदार , गडहिंग्लज यांना आज संघटनेच्यावतीने निवेदन सादर केलेली आहेत . त्यांना भेटून त्यांच्या स्तरावरुन संबंधीत मागण्यांसाठी केंद्र व राज्य शासनाला पाठवावे . त्यामुळे घरेलु कामगारांचा प्रश्न संसद भवनमध्ये मांडून कामगारांच्या व्याख्येमध्ये घर कामाला ही या व्याख्येमध्ये समाविष्ठ करुन घेणेचा प्रयत्न होणे महत्वाचे आहे . तसेच घरेलु कामगारांसाठी केंद्र स्तरावर एका ठोस कायद्याची निर्मिती करुन घरेलु कामगारांनाही कामगार कायद्याच्या चौकटीत आणून कामगार कायद्याचे लाभ मिळवून देणेसाठी प्रयत्न झाला पाहिजे . तसेच राज्य शासनाच्या वतीने घरेलु कामगारांच्या मदतीसाठी निधीची तरतुद करुन तसेच विविध मागण्यांसाठी संघटनेने आग्रह धरलेलो आहे .
शासनाकडे व प्रशासनाकडे संघटनेने केलेल्या मागण्या
१ ) महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यातील त्रुटी दूर करा व मंडळातील भोंगळ कारभार दुर करुन मंडळ सक्षम करा . त्रिपक्षिय मंडळ स्थापन करा .

२ )कोरोना काळ संपुष्टात येई पर्यंत प्रत्येक घरेलु कामगारांना रु . ५००० / निधी देण्यात यावा .
३)जेष्ठ घरेलु कामगार महिलांसाठी विशेष आर्थिक मदत जाहिर करा . ४)केंद्र सरकारतर्फे राज्य शासनाला घरेलु कामगारांना कोविड मदत निधी देणेसाठी बजेटमध्ये तरतुद करावी . ५)कोविड १ ९ च्या काळात शासनातर्फे घरेलु कामगारांना दिला गेलेला कोविड भत्ता फारच तुटपुंजा असलेने तो रु . १५०० / न देता किमान रु . ५००० / करावा यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी.
६)महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाला भरीव आर्थिक तरतुद करा .
७) किमान वेतन , रजा , वैद्यकीय सुविधा , प्रॉव्हीडंड फंड , पेन्शन इत्यादी सामाजिक हक्क त्वरीत लागू करा .
८)कोविड १ ९ सहाय्यता निधी पासून वंचित राहिलेल्या सर्व नोंदणीकृत घरेलु कामगारांना त्याचा लाभ त्वरीत द्या .
९)केंद्र शासनाच्या वेतन संहिता आणि सामाजिक सुरक्षितता संहितेमध्ये घरेलु कामगाराना जोडून त्यांच्यासाठी भरीव मदत देणेत यावी .
१०)सामाजिक सुरक्षा व घरकामगार महिलांच्या किमान वेतनाच्या कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी व्हावी .
११)घरेलु कामगारांकरिता केंद्र स्तरावर एका सर्व समावेशक कायद्याची निर्मिती करण्याकरिता पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा .
१२)घरेलु कामगार मंडळाची हक्क कायद्यांतर्गत पुर्नरचना करणेत यावी .
१३) घरेलु कामगारांना कामगारांच्या व्याख्येत आणून कामगारासाठी लागू असलेली कायद्यांचा फायदा देणेत यावा . तसेच घरेलु कामगार यांना ‘ कामगार ‘ म्हणून दर्जा मिळालाच पाहिजे .
१४ ) घरेलु कामगारांना सामाजिक सुरक्षा , भविष्यनिर्वाह निधी , पेन्शन , आरोग्य सेवेचे लाभ तसेच कामगार म्हणून जे काय अधिकार आहेत त्याची तरतुद करून अंमलबजावणी झाली पाहिजे .
१५ ) कोल्हापूर जिल्हयातील कामगार आयुक्त कार्यालयात घरेलु कामगार कल्याण मंडळामध्ये घरेलु कामगागरांची नोंदणी जलद गतीने होणेसाठी , तसेच त्यातील सर्व त्रुटी व अडचणी दूर कराव्यात आणि ही प्रक्रिया सोपी व सरळ व्हावी .
१६ ) कोल्हापूर जिल्ह्यातील घरेलु कामगारांच्या कुटूंबियांना अंतोदय ( पिवळे ) रेशनकार्ड मिळाले पाहिजे . तसेच या अंतोदय कार्डवर घरेलु कामगारांच्या कुटूंबियाना नियमानुसार धान्य , केरोसीन ( रॉकेल ) व इतर गोष्टी मिळाल्या पाहिजेत .
१७ ) स्वतःचे घर नसलेल्या घरेलु कामगारांना महाराष्ट्र घर निर्माण मंडळाकडून तसेच इतर घरकुल योजनेतून घरे देणेत यावीत आपले विनित संग्राम सावंत जिल्हा समन्वयक, लक्ष्मी कांबळे राज्य सदस्या, रेश्मा कांबळे
विद्या शिंदे, मिरा कवाळे,मंगल कांबळे, सोनाली बळे,शितल केंगारे, प्रियांका दाभाडे,उषा कांबळे,छाया बुचडे, जयश्री कांबळे,गिता कांबळे, पुष्पा पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.