Homeकोंकण - ठाणेथकबाकीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ८० हजार ग्राहकांची वीज खंडित.

थकबाकीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ८० हजार ग्राहकांची वीज खंडित.

थकबाकीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ८० हजार ग्राहकांची वीज खंडित.

मुंबई. प्रतिनिधी.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील चार लाख घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिनाभरात ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे.या विभागात आजवर ८० लाखांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली आहे.

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत २७ लाख ७२ हजार ३६० घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांकडे १८६४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठांसह सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष वीजग्राहकांशी संवाद साधत आहेत. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिनाभरात १५ मार्चपर्यंत ४ लाख १ हजार ७०० थकबाकीदारांनी ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ३८० घरगुती ग्राहकांनी ३०३ कोटी ३७ लाख, ४१ हजार ६२० वाणिज्यिक ग्राहकांनी १२० कोटी ४० लाख तर ७६६० औद्योगिक ग्राहकांनी ५५ कोटी ५६ लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

आतापर्यंत पश्चिाम महाराष्ट्रातील ८० हजार ५९१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. यामध्ये पुणे- ५४,०३४, कोल्हापूर- ४३४१, सांगली- ४३४२, सोलापूर- ८१३८ आणि सातारा जिल्ह्यातील ९७३६ थकबाकीदारांचा समावेश आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील थकबाकी सर्वाधिक

वीज ग्राहकांकडून थकबाकीचा भरणा होत असला, तरी अद्यापही घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात ग्राहक संख्या) पुणे जिल्हा (१०,७५,६२६) ७३८ कोटी १३ लाख, सातारा (२,१३,२८५) ७५ कोटी ३३ लाख, सोलापूर (३,४०,२१८) १७८ कोटी ६५, सांगली (२,७९,३४०) १३६ कोटी ४७ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (४,६२,२२५) २५५ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.