Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदुसऱ्या धरणातील धरणग्रस्तांना वसाहती मधील भूखंड वाटप करुन नये. - चित्रानगर धरणग्रस्त...

दुसऱ्या धरणातील धरणग्रस्तांना वसाहती मधील भूखंड वाटप करुन नये. – चित्रानगर धरणग्रस्त गाव कमिटीचे आजरा तहसिलदार यांना निवेदन.

दुसऱ्या धरणातील धरणग्रस्तांना वसाहती मधील भूखंड वाटप करुन नये. – चित्रानगर धरणग्रस्त गाव कमिटीचे आजरा तहसिलदार यांना निवेदन.

आजरा. प्रतिनिधी. १०

आजरा तालुक्यातील चित्रा नगर ( बुरुडे ) येथे चित्री धरणातून १९९८ साली विस्थापित झालेली वसाहत लाटगाव पैकी गावठाणवाडी या गावचे पुर्नवसन झालेली आहे. पुनर्वसन होऊन २३ – २४ वर्ष झाले ज्या काळात ही वसाहत वसली गेली त्यावेळी असलेली प्रत्यक्षात ७५ भूखंड पाडण्यात आले त्यापैकी ५७ कुटुंबांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत त्यापैकी नागनाथ मंदिर, विश्वनाथ मंदिर, दोन भुखंडांमध्ये पाण्याची टाकी सोलर पॅनल व हातपंप स्थळ, देवस्थान, स्मशानभूमी ही सर्व बांधकामे झालेली असून ती कब्जेपट्टी ताबा दिलेलं नाही त्याप्रमाणे आमच्या रजिस्टर दूध संस्था, वाचनालय, व्यायामशाळा, अंगणवाडी यासाठी स्वतंत्र भूखंडांची मागणी गेली पंधरा वर्षे सतत करत आहोत तरीही याची शासनाने दखल घेतली नाही. तसेच आमच्या भविष्यातील होणाऱ्या वाढीव भूखंडाचा विचार केला गेला नाही. यासाठी शिल्लक राहणारे भूखंड हे वाढवू कुटुंबासाठी आवश्यक आहेत. तसेच गेली २३ वर्षे आम्हाला जनावरे चरण्यासाठी गायरान मिळाले नाही या सर्व परिस्थितीत धरणग्रस्त वसाहतीतील भूखंड वाटप करण्यात आमचा तीव्र विरोध आहे. बळजबरीने भूखंड वाटप व कर्जे देण्यास प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू ही आमची कळकळीची विनंती असल्याचे निवेदन चित्री धरणग्रस्तांनी आजरा तहसिलदार यांनी दिले आहे. या निवेदनावर तानाजी मिसाळ, सुरेश मिसाळ, विष्णू लाड, मनोज चौगुले, प्रकाश लाड, निवृत्ती चौगुले, परसू मिसाळ, शिवाजी मिसाळ, शांता पाटील, उज्वला लाड, लक्ष्मी मरगळे, नंदा मिसाळ, रंजना चौगुले, सुरेखा लांड, मनिषा लाड, माया चौगुले सह ७० धरणग्रस्तांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.