तुकाराम पाटील वडकशिवाले राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले बद्दल – आजरा समृद्धी कंपनी वतीने सत्कार .
आजरा. – प्रतिनिधी. ०८
आजरा वडकशिवाले येथील रीडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड महाराष्ट्र या ठिकाणी सेवा निवृत्त झालेले तुकाराम पाटील वडकशिवाले हे आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे सभासद असून राष्ट्रपती शौर्य सेवा पदक मिळेलेबदल त्याचा आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनी लि. आजरा यांच्या वतीने श्री. पाटील यांचा आजरा अर्बन बॅकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, रवळनाथ इंडियन गॅसचे प्रमुख सौ. श्री. माणसिंग देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे संचालक नारायण मुरकुटे, शिवाजी रावन, पत्रकार संचालक संभाजी जाधव, रामचंद्र मुरुकटे, ग्राम उद्योजक वडकशिवाले कललैश्वर संकपाळ, सह सभासद उपस्थित होते.