वाझेंच्या नेतृत्वातील पथकातील सहकारी पोलीस NIA कार्यालयात दाखल
मुंबई. प्रतिनिधी.१४ :-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी राज्यातील वातावरण चिघळून निघाले होतं.ATS आणि NIA कडून यासंदर्भातला तपास सुरू आहे.काल दिवसभर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॅंट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.यानंतर आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी भारतीय जनता पक्षाने केला आहे.दुसरीकडे सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
दुसरीकडे महत्वाचं म्हणजे वाझेंच्या नेतृत्वातील पथकाचा भाग असलेले पोलीस NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या घराखाली ठाणे ATS टीम दाखल झाली आहे. टीमचा भाग असलेले दोन जण घराखाली चेकिंग करीत असल्याचं वृत्त आहे. विकास पाम या इमारती खाली ATS दाखल असल्याचं कळतंय. त्यामुळे ATS देखील जोरदार कामाला लागलंय असं म्हटलं जातंय.