Homeकोंकण - ठाणेकिरीट सोमय्या हल्ला प्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. - किरीट सोमय्या या...

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. – किरीट सोमय्या या हल्ल्यामध्ये जखमी. ( शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही गुन्हात समावेश. )

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. – किरीट सोमय्या या हल्ल्यामध्ये जखमी. ( शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही गुन्हात समावेश. )

. प्रतिनिधी. मुंबई

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शनिवारी हल्ला झाला होता. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्य़ाचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत.
आता या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही समावेश आहे. किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत निवेदन देण्यासाठी शिवसैनिक उपस्थित होते. पण किरीट सोमय्या यांनी हे निवेदन घेतले नाही म्हणून शिवसैनिकांचा संताप झाला आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला, असा आरोप होतो आहे.

या किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. – किरीट सोमय्या या हल्ल्यामध्ये जखमी. ( शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही गुन्हात समावेश. ) आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.