Homeकोंकण - ठाणेएसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? विलीनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर होण्याची शक्यता.

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? विलीनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर होण्याची शक्यता.

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? विलीनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर होण्याची शक्यता.

मुंबई. प्रतिनिधी. ०३

गेल्या तीन महिन्यांपासून एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्या शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने उच्च स्तरीय त्री सदस्यीय समितीची स्थापना करून विलीनीकरणावर अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. तसेच १२ आठवड्यात मुख्यमंत्र्यांमार्फत अहवाल न्यायालयात सादर करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आज गुरूवार दि.३ फेब्रुवारी रोजी १२ आठवड्याची मुदत संपत आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा अहवाल राज्य सरकारकडून कोर्टात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एसटी कर्माचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
( विलीनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर होण्याची शक्यता.)
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थ खात्याचे सचिव आणि परिवहन खात्याचे सचिव यांच्या समितीकडून तयार करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटीच्या २८ कामगार संघटनांकडून विलीनीकरणाबाबत व्यक्तिगत अभिप्राय मागितला होता. तसेच १२ आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्फत अहवाल कोर्टात सादर करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आज १२ आठवड्यांची मुदत संपत आहे.
( विलीनीकरणासंदर्भातील अहवाल तयार – अनिल परब )
देशातील अन्य काही राज्यातील एसटीसंदर्भातील विलीनीकरणाचा निर्णय कोणत्या धोरणात घेण्यात आला आहे. याचा तपशीलवार अभ्यास केला असल्याचं सांगितलं जातंय. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या अभिप्रायानंतर विलीनीकरणासंदर्भातील अहवाल तयार करण्यात आला असून १२ आठवड्याची मुदत संपल्यानंतर तो सादर केला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
( कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई सुरू)
राज्यभरात सुरू असलेल्या संपामुळे एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई सुरू आहे. बुधवारी एकाच दिवशी १८९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ७ हजार २५२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ८ हजार २७३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्री सदस्यीय समितीच्या अहवालानंतर न्यायालय विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय निर्णय घेणार, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.