साखर कारखाना कामगारांना १ एप्रिल २०१९ पासून १२% वेतनवाढ जाहीर. – तर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने कामगारांच्या खात्यावर वर्ग केले वेतन.
कोल्हापूर. प्रतिनिधी.
राज्यातील सर्व साखर कामगारांना पगार वाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सर्व साखर कारखाना कामगारांना १ एप्रिल २०१९ पासून १२% वेतनवाढ जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचारी कामगारांना जानेवारी २०२२ च्या पगारापासून १२% पगारवाढ करून जानेवारी महिन्याच्या पगारवाढीसह कामगारांच्या खात्यावर वर्ग केला गेला आहे.
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सातत्याने कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. १२% पगार वाढीमुळे सर्व कर्मचारी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या कामगार संघटनेमार्फत कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, तज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी चेअरमन उत्तम आवाडे (आण्णा) आणि व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
या पगार वाढीसाठी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी अध्यक्ष सर्जेराव हळदकर, खजिनदार रघुनाथ मुधाळे, सेक्रेटरी शांतीनाथ चौगुले, सेक्रेटरी महावीर कल्याणी, सुरेश पोवार, ऋषी ऐतवडे, अविनाश कांबळे, श्रीकांत करडे, शंकर पाटील, बाबू दुटन्नावर, कुंभोज चे ग्रा. पं. सदस्य अनिकेत चौगुले आदी उपस्थित होते.