आजऱ्यात शिवसेनेचा तिरडी मोर्चा. – – संकेश्वर आजरा आंबोली नॅशनल हायवेचे काम तात्काळ सुरू करा.
आजरा. प्रतिनिधी.
संकेश्वर आजरा आंबोली नॅशनल हायवेचे काम लवकरच चालु व्हावे या मागणीसाठी आजरा शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय आजरा समोर रास्ता रोको करून निदर्शने केली.
संकेश्वर आजरा आंबोली रोडचे काम तात्काळ चालू करावे या मागणीसाठी तिरडी मोर्चा काढत तहसीलदार कार्यालय समोर रास्ता रोको करून घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पवार राजेंद्र सावंत युवा सेनेचे महेश पाटील सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.