Homeकोंकण - ठाणेआजरा सूतगिरणी गार्डन क्लब कोल्हापूर वतीने "किंग ऑफ द शो" हा विशेष...

आजरा सूतगिरणी गार्डन क्लब कोल्हापूर वतीने “किंग ऑफ द शो” हा विशेष पुरस्कार .

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी गार्डन क्लब व शाहू कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या पुष्प प्रदर्शन व उद्यान स्पर्धेमध्ये गुलाब पुशपा साठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा किंग ऑफ द शो या पुरस्कारांसह आणि सहा गटातील पुरस्कारांना गौरवण्यात आले हा कार्यक्रम नुकताच राजश्री शाहू कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाला या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांच्या हस्ते करण्यात आले आजरा सुतगीरणी वतीने संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ.अनिल देशपांडे यांनी व हा पुरस्कार गार्डन विभागाचे माळी लक्ष्‍मण भोसले, अशोक कुंभार यांच्या समवेत स्वीकारला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण नरके होते. राज्यातील अग्रमानांकित आजरा सूतगिरणी यापूर्वी तांत्रिक आर्थिक व ऊर्जा बचतीच्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरीसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सुतगिरण कार्य स्तरावरील गार्डनमधील गुलाब तसेच लोन आणि देखील विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे निसर्गरम्य स्वच्छ व सुंदर आजरा तालुका अशी ओळख या गौरवने आणखी दृढ झाली आहे. सूतगिरणी मार्फत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने सूतगिरणी कार्यस्थळावर जवळपास दोन ते अडीच हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड उपक्रमांमध्ये देखील मोठा सहभाग घेतला आहे.
गार्डन विकसित करण्याकरिता विशेष योगदान दिले आहे. सूतगिरणीच्या वतीने या प्रदर्शनामध्ये सूतगिरणीच्या बागेतील विविध जातीची गुलाब फुले स्पर्धेकरता ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणार पुरस्कार मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.