आजरा. – प्रतिनिधी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आजरा वाडा गल्ली मज्जित समोरील जागेत बांधकाम केलेल्या गाळ्याबाबत कारवाई करण्यासंदर्भात पत्र त्यासंदर्भात तब्बल एक महिना दहा दिवस कारवाईची वाट पाहिली पण काहीही कारवाई झाली नाही.
म्हणून दिनांक २१/१२/२०२१ रोजी बाधकाम विभागाला पुन्हा अमरण उपोषणास बसणार असल्याचे बाबतचे निवेदन देऊन . सात दिवसाच्या आत निर्णय घेणे विषयी सांगितले होते. परंतु आज दि. २८ रोजी दिवसभराच्या घडामोडी, आंदोलकाचा पवित्रा गाळे पाडल्याशिवाय अमरण उपोषण मागे न घेण्याचा निर्णय, प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी होत असलेली बैठक यामध्ये अखेर ते वादग्रस्त गाळे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतीची संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाला व दोन महिन्यापासून वादग्रस्त ठरलेले आजरा येथील भुदरगड पतसंस्थेच्या शेजारील नऊ गाळे अखेर नगरसेवक धनाजी पारपोलकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु घटनास्थळी अंधारात बांधकाम पाडता येणार नसल्याने बुधवार दि. २९ रोजी सकाळी १० वा. बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे नगरपंचायत, व बांधकाम विभाग यांनी लेखी अश्वासन व पोलिस स्टेशन यांनी दिलेला शब्द नगरसेवक धनाजी पालपोलकर यांनी मान्य करत अखेर अमरण उपोषण मागे घेतले होते. दि. २८ रोजी रात्री विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे रात्री गाळे पाडण्याचा झालेला निर्णय स्थगित करावा लागला व नगरसेवक श्री. पालपोलकर यांना सकाळी १० वा. बेकायदेशीर बांधलेले गाळे हटवण्यात येतील असे पत्र बांधकाम विभाग यांनी दिले त्याप्रमाणे आज दिनांक २९ रोजी गाळे पाडण्याचे ठरले यामधील चार गाळे पाडले व राहिलेले पाच गाळे काही जुन्या व्यावसायिकांचे असल्याने व वकील मार्फत नोटीस बांधकाम विभागाला आल्याने सदर गाळे पाडण्याचे कामकाज थांबले यानंतर पुन्हा यातील काही गाळेधारक आमची गाळे पाडला तरी चालेल अशी मागणी गाळेधारकांनी केल्यामुळे पुन्हा दोन गाळे काढण्यात आले उर्वरित तीन गाळे हटवण्याचे स्थगित केले . यामुळे पुन्हा आंदोलन सहकारी संतापले व दिलेला शब्द व दिलेले पत्र उपोषण कर्ता यांची फसवणूक करून उपोषण सोडायला लावल्यास भाग पाडले अशी चर्चा होत बांधकाम विभाग व नगरपंचायत यांना नागरिकांनी धारेवर धरले यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपण याबाबत अभ्यास करून निर्णय घेऊ असे सांगितले .
चौकट.
[ बेकायदेशीर बांधलेले गाळे हटवताना उप. नगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर यांनी आजरा शहरातील बेकायदेशीर असलेले इतर गाळेही बांधकाम विभागाने उद्यापासून हटवावे अशी मागणी करत सध्या चांगल्या पद्धतीने तयार केलेले गाळे गोरगरीब जनतेला मिळाले नाहीत. ही बाब चुकीची आहे. व सुशोभित बांधलेले गाळे हटवण्यास प्रशासनाला भाग पाडणे म्हणजे गोरगरिबांच्या व्यवसायिकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम काही लोकांनी केले असल्याचे मत उप. नगराध्यक्ष श्री केसरकर यांनी यावेळी घटनास्थळी बोलून दाखवले. ]
या बेकायदेशीर अतिक्रमण मध्ये बांधकाम केलेल्या नऊ गाळ्यापैकी सहा गाळे प्रशासनाने उपोषकर्च्या मागणीनुसार जमीनदोस्त केले.
चौकट.
[ दिवसभरातील घडलेल्या नाट्यमय घडामोडी अखेर गाळे पाडण्याचा निर्णय झाला परंतु उद्यापासून बांधकाम विभागाचे अधिकारी श्री सावंत यांनी सांगितले की आजरा शहरातील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर असलेले गाळे उद्यापासून त्याची चौकशी होऊन सदर गाळे अतिक्रमण व बेकायदेशीर असल्यास काढण्यात येतील अशी माहिती श्री. सावंत यावेळी दिली. }
आजरा पोलिसांमार्फत जिल्ह्यातील जलद कृती पथक १-१४ चा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी आर्यन सावंत, मुख्याधिकारी अजिक्य पाटील, नायब तहसिलदार संजय कांबळे, सपोनि. सुनिल हारुगडे, तसेच भाजप ता. अध्यक्ष सुधीर कुंभार, डाॅ. श्रद्धांनंद ठाकूर, नगरसेवक सह श्री पालपोकर समर्थक उपस्थित होते..
