आजरा. प्रतिनिधी.
छत्रपती युवा ग्रुप उत्तुर ता. आजरा वतीने बंगलुर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना च्या निषेधार्थ उत्तुर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दुधाचा अभिषेक केला व शिवभक्त मावळे यांच्या उपस्थितीत निषेध करण्यात आला. राजमाता जिजाऊ फाउंडेशन व छत्रपती युवा ग्रुप उत्तुर व शिवभक्त यांनी बेंगळुर येथे झालेली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबविटंबनेचा, तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी उत्तुर व उत्तर परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
