Homeकोंकण - ठाणेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब ? - रामदास कदम यांचा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब ? – रामदास कदम यांचा हल्लाबोल

मुंबई:- प्रतिनिधी.

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना समर्थकांना डावलल्यामुळं नाराज असल्यानं शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख आहेत की, अनिल परब असा सवाल त्यांनी केला.

शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन, असंही ते म्हणाले.

रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:-

➖कथित क्लिप जी आली होती, त्यात कुठेही शिवसेनेबाबत कुठेही, काहीही बोललो नाही.

➖शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगेन, किरीट सोमय्यांसोबत कधीही काहीही बोललो नाही.

➖हा मला बदनाम करण्याचा कट, माझं राजकीय आयुष्य संपवण्याचे कारस्थान

➖दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत, त्यामुळे मी काही बोललो नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माहिती दिलीय.

➖अनिल परब हे फक्त १५ ऑगस्ट २६ जानेवारीला जिल्ह्यात येतात.

➖अनिल परब यांचे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कुठलंही काम नाही, पदाधिकाऱ्यांचीही नावे त्यांना माहीत नाहीत.

➖परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे पक्षाविरोधात बोलणे नव्हे.

➖राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेनेतल्या काही लोकांचा आहे.

➖अनिल परब यांनी निवडणुकीत उभे राहून निवडून येऊन दाखवावे.

➖माझ्या मुलाला विधानसभेचे तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे संजय कदम यांना मातोश्रीवर घेऊन आले होते.

➖अनिल परब हे पक्षासोबत गद्दारी करत आहेत.

➖उदय सामंत यांच्याकडून आम्हाला पक्षनिष्ठा शिकावी लागत आहे.

➖शिवसेनेला गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम? हे सांगावे.

➖शिवसेना संपवण्याचे काम सुरू आहे.

➖उद्धव ठाकरे साहेब, तुमच्या कारमध्ये मी समोरच्या सीटवर बसलेलो असायचो. उद्धवसाहेब तुम्हीच यात लक्ष घालावे ही विनंती.

➖दोन वर्षांत फक्त एकदाच उद्धव ठाकरेंना भेटलो. मी मातोश्रीवर गेलो नाही. मंत्रालयात गेलो नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.