आजरा. प्रतिनिधी. १८.
आरदाळ येथील भैरीदेव मंदिरासमोरील सभागृहात दि. १८ रोजी अपंग बांधवांना मार्गदर्शन करुन योजनांची माहीती देण्याचा कार्यक्रम पार पडला. दिव्यांग सेना कोल्हापूर प्रतिष्ठान व ग्रा.पं.आरदाळच्या वतीने शिबीर घेण्यात आले. कोल्हापूर प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्क प्रमुख विकी मल्होत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजाराम पोवार (धामणे) विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्तावीक कॉ. शिवाजी गुरव यांनी केले. प्रास्ताविकात शिवाजी गुरव म्हणाले, अंपग बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहीजे.नुसलते मेळावे घवून चालत नाही, योजनांची माहिती ही प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला मिळाली पाहिजे, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिव्यांग सेना कोल्हापूर प्रतिष्ठान यांनी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही लागेल ती मदत करण्यास तयार आहोत.
जिल्हा दिव्यांग सेना अध्यक्ष विकी मल्होत्रा यांनी यावेळी अपंगांना मार्गदर्शन करताना विनाअट घरकुल मिळणे, ग्रा.पं.कडील पाणीपट्टी 50% सवलत, घरफाळा ५० % सवलत, रेशनवरील ३५ किलो धान्य, अपंगांच्या बचत गटांसाठी कर्ज पुरवठा,सामुहीक जागा २ गुंठे राखीव, सरकारी नोकरीत ३% आरक्षण, अपंगांना साहित्य, अपंग व्यक्तीच्या लग्नासाठी एका व्यक्तीला २५ हजार दोघे अपंग असल्यास ५० हजार रुपये मिळण्याची सोय इ.आर्थिक लाभाच्या योजनांबरोबरच अपंगाना कोणी चिडविले किंवा हिणविल्यास त्यांचेवर गुन्हा नोंद करणेची कायदयाची सोय असुन त्या विषयीच्या कायद्याची माहिती शिबीरामध्ये दिली. यावेळी उपसरपंच अमोल बांबरे, विशाल गुरव, दत्तात्रय जाधव, शामराव कांबळे, सदाशिव शिवणे, बबन तोरस्कर यांचेसह २५ दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. आभार दिलीप शिंत्रे यांनी मानले.