Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार. - श्रमिक मुक्ती दल आजरा.

मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार. – श्रमिक मुक्ती दल आजरा.

मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार. –
श्रमिक मुक्ती दल आजरा.
आजरा- प्रतिनिधी.
श्रमिक मुक्ती दलाचे कार्यध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली होणारा मंगळवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या तयारीच्या बैठकीत घेण्यात आला. आजरा तहसील कार्यालयावर मंगळवारी नऊ मार्चला तालुक्यातील अपंग, विधवा, परितक्त्या, धनगर समाज आणि धरणग्रस्त शेतकरी यांचा संयुक्त मोर्चा आयोजित केला आहे. गेली अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा यासाठी हा मोर्चा निघणार आहे.
आजरा तालुक्यात गेली काही दिवस जंगली प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष होताना दिसत आहे. पिकांचे नुकसान होत आहेच पण काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याबाबत ठोस उपाय योजना झाली पाहिजेत यासह वनविभागाकडे धनगर समाजाचे वनहक्काचे रखडलेले दावे तातडीने मंजूर झाले पाहिजेत, या मागण्यांसह अपंग, विधवा, परितक्त्या यांना वेळेत पेन्शन मिळाली पाहिजेत. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून तालुक्यातील धरणांची कामे पूर्ण केली पाहिजेत. यासाठी हा मोर्चा होणार आहे तरी या मोर्चात तालुक्यातील शेतकरी, धरणग्रस्त, अपंग, विधवा, परितक्त्या, धनगर समाज यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन करण्यात आले. बैठकीला दशरथ घुरे, प्रकाश मोरूसकर, मुकुंद नार्वेकर, नारायण भडांगे, निवृत्ती फगरे, विजय पाटील, गोविंद पाटील, नारायण राणे, भीमराव माधव, संतोष सुतार, सरिता कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.