Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा सूतगिरणीच्या चेअरमनपदी श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांची निवड.

आजरा सूतगिरणीच्या चेअरमनपदी श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांची निवड.

आजरा. प्रतिनिधी. १०

आजरा येथील अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी अन्नपूर्ण चराटी यांची व व्हाईस चेअरमन पदी डॉ. अनिल देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीचे सभा सूतगिरणी कार्यस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आजरा सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून चेअरमन निवडी प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ सूतगिरणी समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले सूतगिरणीच्या यशस्वी वाटचालीमध्ये सातत्य राखण्याची विद्यमान संचालक मंडळावर मोठी जबाबदारी आहे सूतगिरणीचे अध्यक्ष अन्नपूर्णा चराटी व व्हा. चेअरमन अनिल देशपांडे यांनी संचालक मंडळाचे सहकार्याने सूतगिरणी नावलौकिक मिळवून दिला आहे. सूतगिरणीच्या यशस्वी वाटचाली मध्ये संस्थेचे ॲडव्हायझर चंद्रशेखर फडणीस व त्यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल राखणारे जनतेने अमोल वाघ आणि सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार यांचे योगदान मोठे आहे सुतगिरण व्यवस्थापन परिस्थिती नसताना देखील कामगार कर्मचारी यांना १ कोटी ३५ लाख इतकी वार्षिक पगारवाढ दिली त्याचप्रमाणे दीपावली बोनस १२% दिला आहे. आज जरा सुतगिरण परिवार ही संकल्पना आणखी दृढ होत आहे. आजरा तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासामध्ये आजरा सोडविण्याचे मोठे योगदान देत आहे सन २०२१ ते २०२६ करिता संचालक मंडळ बिनविरोध निवडले आहे त्याकरिता सर्व सभासद बंधु भगिनी धन्यवाद देतो असे सांगितले असे त्यांनी सांगितले निवडणूक निर्णय अधिकारी श्री काकडे यांनी सूतगिरणी व्यवस्थापनाचे घेतल्या शिस्तीसाठी व काटेकोर नियोजन कौतुक केले असे नूतन संचालक मंडळ व त्यांचे अभिनंदन केले चेअरमन निवडीनंतर चेअरमन व . व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला चेअरमन
पदासाठी यांना त्यांचे नाव शंकर टोपले यांनी सुचवले व त्यास अनुमोदन कृष्णा गिरी गोसावी यांनी दिले त्याप्रमाणे वाईस चेअरमन पदी डॉ. अनिल देशपांडे यांचे नाव जयसिंग देसाई यांनी सुचवले व त्यास अनुमोदन सौरभ नाईक यांनी दिली या निवडी प्रसंगी शंकर चोपले चंद्रशेखर फडणीस यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अविनाश सोनटक्के, नारायण मुरकुटे, राजू पोतनीस, डॉ.संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, सुधीर कुंभार मालूताई शेवाळे, मनीषा कुरुनकर ,यांच्यासह चिप. अकाउंटंट अधिकारी विष्णू पवार,
प्राॅड.मॅनेजर श्रीकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. अॅडमिनिस्टेशन ऑफिसर सचिन सटाले यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.