Homeकोंकण - ठाणेप्रलंबित प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत उचंगी धरणावर पाय ठेवू देणार नाही :...

प्रलंबित प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत उचंगी धरणावर पाय ठेवू देणार नाही : उचंगी प्रकल्पग्रस्तांचा इशारा.

आजरा. प्रतिनिधी.

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.
तोपर्यंत उचंगी धरणावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कॉ. धनाजी गुरव यांनी आज उचंगी प्रकल्पस्थळी झालेल्या निर्धार परिषदेवेळी बोलताना दिला. यावेळी बोलताना कॉम्रेड गुरव म्हणाले, एकदा प्रकल्पामध्ये पाणी अडवले की भविष्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. आज पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीमुळे व ताकदीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.
पुनर्वसनाचे शेवटचे काही महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्याआधीच प्रकल्पात पाणी साठवणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रकल्पग्रस्तांनी अशावेळी सावध राहून ताकदीने लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.जोपर्यंत शासनाकडून पुनर्वसनाबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पस्थळी संबंधितांना पाय ठेवू द्यायचा नाही असा निर्धारही या वेळी करण्यात आला. कॉ.संजय तरडेकर, कॉ. अशोक जाधव, कॉ. शिवाजी गुरव यांनीही मार्गदर्शन केले परिषदेस उचंगी,जेऊर, चितळे, चाफवडे येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.