आजरा. प्रतिनिधी. २९.
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखाना वतीने सोम. दि.२९ रोजी गंगामाई वाचन मंदिर येथे ऊस उत्पादक वाढीकरिता ऊस परिसंवादाचे आयोजन केले होते. सदर परिसंवादास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील हे मार्गदर्शन केले. श्री माने पाटील सन १९९३ पासून २०१४ पर्यंत वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते ऊस आजरा येथील ऊस परिषद परिसंवादास कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. राज्यात २३८ साखर कारखाने आहेत. पैकी कारखाने ९६ सहकारी तत्त्वावर चालतात तर उर्वरित खाजगी कारखाने आहेत. परंतु राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालेले नाही राज्यातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न पोचल्याने दिसत आहे. याबाबत आजरा, गडहिंग्लज, चंदगड या विभागातील काही उत्कृष्ट शेतकऱ्यांची उदाहरण देत त्यांनी या शेतकऱ्यांच्या शेताला भेट द्या. त्यांनी शेतीचे उत्पादन प्रामुख्याने ऊस उत्पन्न कशा पद्धतीने घेतात याची माहिती घेतल्यास आपल्याला आपल्याला सोपे जाईल. खरंतर उसाची लागण करत असताना कमी साखरेच्या उसाचे बियाणे घेऊन ऊस लागण केलेले अधिक उत्तम असते. जमिनीचे माती परीक्षण करून घेऊन त्या जमिनीत कोणते बियाणे लागण केल्यास चांगल्या प्रतीचे ऊस उत्पन्न येऊ शकते याचाही अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात ऊस परिषदेत वाढ होण्यासाठी नवनवीन प्रयोग केले आहेत. यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन केले आहे. असे बोलताना श्री. माने पाटील म्हणाले. तर कारखाना चेअरमन सुनिल शिंत्रे म्हणाले आजरा साखर कारखाना क्षेत्रात सध्या ३ लाख टन उसाचे उत्पादन आहे सदर क्षेत्रातून एकरी २५ ते ३० टन ऊस उत्पादन घेत आहे. कारखान्यास ऊस वाहतूक सर्व खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त उसाचे उत्पादन हे कारखाना जवळील शेत्रातील झाले पाहिजे त्यासाठी कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होऊन पर्यायाने कारखान्याकडे येणाऱ्या उसाला चांगला भाव मिळेल मदत होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न उस जातीच्या उसाची लागवड व्हावी यासाठी श्री माने – पाटील यांचे मार्गदर्शन आपणास उपयोगी आहे. कारखाना कार्यक्षेत्र हे डोंगराळ क्षेत्र असून निचरा होणाऱ्या जमिनीत आहे. यामुळे जमिनीचा पोत कसा ठेवावा कोणती औषधे तन्नशक वापरावी याबाबतची माहिती मिळणार आहे तरी ऊस उत्पादकांनी शेतकऱ्यांनी या लाभदायक परिसंवादाचा लाभ मिळाला आहे. आपल्या तालुक्यातील ऊस हा आजरा साखर कारखान्याला दिला पाहिजे यासाठी सर्व शेतकरी उत्पादकांनी प्रयत्न केले पाहिजेत व सर्व ऊस उत्पादकांनी आजरा साखर कारखाना आपला ऊस पाठवून देऊन सहकार्य करण्याचे अहवान चेअरमन श्री शिंत्रे यांनी केले. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत बोलताना म्हणाले संचालक मंडळ आपल्या कारखान्याकडे ऊस येण्यासाठी फारसे प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे असे न होता चेअरमन यांच्यासोबत सर्व संचालकांची तितकीच जबाबदारी आहे की आपल्या कारखाना ला जास्तीत जास्त पाऊस येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे श्री सावंत बोलताना म्हणाले. यावेळी शेतकरी मंडळाच्या वतीने संभाजी इंजल यांनी कारखाना अनेक अडचणीचा सामना करत कारखाना चालु केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले. व यापुढे झालं गेलं विसरून जाऊन कारखाना या पुढे चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी सर्व संचालक मंडळाने प्रयत्न केले पाहिजेत असे श्री इंजल म्हणाले.
त्याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंदराव कुलकर्णी कार्यकारी संचालक डॉ. डी ए. भोसले मुख्य शेती अधिकारी एस.आर चौगुले , तसेच संचालक सह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.