आजरा. प्रतिनिधी. २३
आजरा येथील नवनाट्य मंडळ आयोजित कै. रमेश टोपले नाट्य महोत्सव सन. २०२२ दि. ८ ते १५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी दिली अध्यक्षस्थानी कै.रमेश टोपले राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस होते. यावेळी श्री. फडणीस म्हणाले मागणी वर्षात कोरोणामुळे नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला होता. २०२२ मध्ये होत असलेला सातवा नाट्य महोत्सव आहे. राज्यातील अनेक भागातुन नाट्य प्रेमी आपली कला सादर करण्यासाठी येतात.. सर्व नाटक चांगले असतात यामध्ये आजरा नाट्य मंडळाचे नाटक. “घरोघरी हिच बोंब” हे नाटक असणार आहे. तर नाट्य महोत्सवाचे पहिले नाटक दि. ८ जानेवारी रोजी नाटक “नाथ हा माझा” अभिव्यक्त – नाट्यसंस्था सातारा, दि. ९ रोजी नाटक- “मंदारमाला” देवलस्मारक सांगली , दि १० रोजी नाटक – “द प्लान” – संस्कार भारती पश्चिम प्रात पुणे., दि. ११ रोजी. नाटक “भवाल” -हंस संगित नाट्य मंडळ गोवा., दि. १२ रोजी नाटक “ग्वाही” मैत्रय थिएटर मुंबई., दि. १३ रोजी नाटक – “खिडक्या” – नवरंग संस्कृतिक सांगली. , दि. १४ ” बाकी शुन्य” साई कलामंच कुडाळ, दि. १५ आजरा नाट्य मंडळाचे नाटक – “घरोघरी हिच बोंब” अशी नाटके होणार आहेत. तरी नाटक रसिकांनी या नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आजरा नाट्य मंडळ यांनी केले आहे यावेळी डॉ. अनिल देशपांडे, मायदेव सर, शंकर टोपले सह महोत्सवाचे सर्व सदस्य उपस्थित होते.