आजरा. प्रतिनिधी. २१.
आजरा तालुक्यासह जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरी याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विभाग गडहिंग्लज कॅप इचरकरंजी सौ जयश्री गायकवाड, उपविभागीय अधीक्षक राजीव नवले, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज विभागात होणाऱ्या मोटर सायकल चोऱ्या यांनी ही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच आजरा सपोनि सुनिल हारुगडे यांनी आजरा येथील स्टाप. उप. निरिक्षक युवराज जाधव, पो. शि. प्रशांत पाटील, अनिल तराळ, चेतन घाटगे, अशोक शेळके आनंदा नाईक यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने शोध पथक व आजरा पोलीस स्टेशन स्टॉप यांनी आजरा देवकांडगाव या मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना देवकांडगाव मार्गावर एक इसम मोटरसायकलवर संशयित रित्या आढळून आल्याने त्याची चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देत नसल्याने त्याला आजरा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आल्यानंतर कसून चौकशी केली असता सदर इसम शंशांक शिवाजी पाटील सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर येथील असल्याचे सांगितले व त्याच्या जवळ असलेली मोटर सायकल ही संभाजी चौक आजरा येथून चोरले असल्याचे कबूल केले. सदर आरोपीस अटक करून त्याने रिमांड मुदतीत कोल्हापूर गडहिंग्लज या परिसरातून सहा मोटर चोरी केले असल्याचे कबूल केले. , यानंतर सदर आरोपी वर आजरा पोलीस स्टेशन स्टाफ यांनी कारवाई केली आहे.