आजरा. प्रतिनिधी. १४.
आजरा येथील आण्णा – भाऊ समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६४ वा. वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी होते. स्वागत डॉ.अनिल देशपांडे यांनी केले. तर प्रास्ताविक विजयकुमार पाटील यांनी केले यावेळी बोलताना जि. प. उपाध्यक्ष श्री शिंपी म्हणाले आजरा तालुक्याच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे मागील चाळीस वर्षात ज्या जबाबदाऱ्या हाती घेतल्या त्या – त्या पार पडल्या आहेत. परंतु राजकारण व समाजकारण करत असताना सोबत तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे यासाठी यापुढील तालुक्याच्या विकासाला महत्त्व देणे गरजेचे आहे. असे श्री. शिंपी म्हणाले.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले जिद्द चिकाटी म्हणजेच अशोक चराटी. सध्या आजरा तालुक्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत. अण्णांच्या राजकारणात मागील वारसा हा महत्त्वाचा आहे. अण्णा – भाऊंच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनतेचा व तालुक्याचा विकास होईल अशा पद्धतीने सर्व जण एकत्र राहून काम करूया यावेळी श्री चराटी यांना वाढदिवसानिमित्त भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती मनोगतात बोलताना अशोक सराटी म्हणाले माझ्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी आला आहात. आपल्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. राजकारण करत असताना विकास डोळ्यासमोर ठेवून मी काम करत असतो आजरा सूतगिरणी ही राज्यासह देशात चांगल्या पद्धतीने चालू आहे. सोबत गारमेंट च्या माध्यमातून अनेक महिला काम करत आहेत. राजकारण करत असताना अगोदर मी जनतेचा विचार करत असतो.
मला निवडणुकांच्या चिंता नाही होऊ घातलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल तो लागलेलाच आहे. ६३ ठरावधारक सोबत आहेत. गेले बरेच दिवसांपासून तालुक्यातील मंडळींची इच्छा होती की जयवंत शिंपी यांच्या सोबत राहुन काम करावे. म्हणून तालुक्यातील जनतेच्या विचाराने आम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. पण मी आजही भाजपातच आहे. असे श्री. चराटी बोलताना म्हणाले. यावेळी माजी मंत्री भरमु पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी उद्योजक रमेश रेडेकर, भाजप ता. अध्यक्ष सुधीर कुंभार, शिवसेना ता. अध्यक्ष राजेंद्र सावंत, नगरसेवक विलास नाईक, किरण कांबळे, संजीवनी सावंत, सुंभदा जोशी, सुमय्या खेडेकर, कारखाना संचालक दिगंबर देसाई, तसेच किशोर भुसारी, सुरेश डांग, जनार्धन निऊगरे, आजरा अर्बन, अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. बी. पाटील यांनी केले आभार डॉ. दिपक सातोसकर यांनी मानले.
