Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभोगावतीचा अनागोंदी कारभार सभासदांच्या समोर मांडणार; स्वाभिमानी शेतकरी संघटना

भोगावतीचा अनागोंदी कारभार सभासदांच्या समोर मांडणार; स्वाभिमानी शेतकरी संघटना

भोगावतीचा अनागोंदी कारभार सभासदांच्या समोर मांडणार; स्वाभिमानी शेतकरी संघटना

राशिवडे : प्रतिनिधी

भोगावती साखर कारखान्याचा अनागोंदी कारभार लपवण्यासाठीच ऑनलाईन वार्षिक सभा घेण्याचा निर्णय घेतला असून या कारभाराची लफ्तेरे सभासदांच्या समोर आम्ही उघडी करणारच असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेस विलास पाटील कोथळी, रावसाहेब डोंगळे घोटवडे, रंगराव पाटील आदी उपस्थित होते.
सभासदांना अंधारात ठेवून एफआरपी दोन टप्प्यात मिळावी असे करार शेतकऱ्यांकडुन  करून घेतले होते. ते करार स्वाभिमानीने फाडून टाकत जनजागृती केली. अशा शेतकरी सभासदांना ऑनलाईन सभा कळणार काय हाच मोठा प्रश्न आहे.

       भोगावती साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ६ मार्च रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानीने भोगावतीच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
        २०१७/१८ हंगामातील २०० रुपये प्रमाणे थकीत आठ कोटी रुपये तर सभासदांची चाळीस महिन्याची साखर द्यावी लागणार म्हणून हंगामाच्या पार्श्वभूमी वर अध्यक्षांनी राजीनाम्याची नौटंकी करण्यात केली. आणि या नोटंकीत उपाध्यक्षासह संचालक मंडळानेही भूमिका पार पाडली. लाखो रुपये खर्चून भोगावती ॲपचे थाटामाटात अनावरण केले. या अँप मुळे कोणाचा फायदा झाला. शेतकऱ्यांना तर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सभासदांना मिळणारी साखरेचे दर सभासदांची पूर्वपरवानगी न घेता दर वाढवले कोणाच्या आदेशाने, गळीत हंगामाच्या सुरवातीलाच भोगावतीचा गिअर खराब झाला यामुळे सुमारे पाच हजार टनाचा रस वाया गेला तर वाहतूक दारांच्या संपामुळे सुमारे पाच कोटींचा तोटा झाला याला जबाबदार कोण?
         भोगावती चा उतारा फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत चांगला होता. त्यानंतर तो जाणिवपुर्वक घसरत चाललाय हा उतारा घसरण्यामागे शेती विभागाचा नियोजनशून्य कारभार असून त्याचा फटका ऊस उत्पादकांना पुढील हंगामात होणार आहे. या नियोजनशून्य कारभार ची जबाबदारी कोण घेणार? बैलगाडी टायर मध्ये सर्वात कमी किंमतीचे टेंडर असूनही जादा किमतीचे टेंडर पास करण्यात आले याचा जाब ज्येष्ठ संचालकांनी विचारला होता त्याचे पुढे काय झाले. कारखाना परिसरातील वृक्षतोड करून कोणाचे हित जोपासले. असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.

चौकट
भोगावतीचे ऑडिट रिपोर्ट बाहेर जाऊ नयेत यासाठी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी ऑडीटरच बदलण्याचा पराक्रम केला असून यावर्षीचे ऑडिट पूर्णतः मॅनेज केले आहे. भोगावतीच्या कर्जाची चारशे कोटी कडे वाटचाल सुरू असून नेमके किती कर्ज भोगावती वर आहे, या कर्जातून किती रकमेची परतफेड झाली याची माहिती सभासदांना संचालक मंडळाने द्यावी अशी मागणी  जनार्दन पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.